
28 जुलैपासून सुरू होणाऱ्या चार सोमवारांना भगवान शंकराची पूजा विशेष महत्त्वाची आहे.
प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ, मूग आणि जव यापैकी एक धान्य शिवलिंगावर अर्पण केले जाते.
शिवामूठ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होतात, धनधान्य वाढते आणि जीवनात सुख-शांती मिळते.
Shivamuth offering rituals for Shravan Somwar : श्रावण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना असून, यातील प्रत्येक सोमवार, म्हणजेच ‘श्रावणी सोमवार’, भगवान शंकराच्या भक्तीला समर्पित आहे. यंदा पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आला आहे. या दिवशी भक्त उपवास, पूजा आणि शिवामूठ अर्पण करतात. शिवामूठ ही परंपरा प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी पूर्ण केली जाते, जसे की पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्याला तीळ, तिसऱ्याला मूग आणि चौथ्याला जव. ही धान्ये शिवलिंगावर अर्पण केल्याने धनधान्याची समृद्धी, मनोकामना पूर्ती आणि आध्यात्मिक शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. आज श्रावणी सोमवारचे महत्त्व, पूजा विधी आणि शिवामूठ कशी वाहावी याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया