Lord Ram Rangoli Designs : रामलल्लाच्या स्वागतासाठी दारापुढे काढा आकर्षक अन् सुंदर रांगोळी; पाहा या सोप्या डिझाईन्स

रामलल्लाच्या स्वागतासाठी दारापुढे काढा आकर्षक अन् सुंदर रांगोळी...
Lord Ram Rangoli Designs : रामलल्लाच्या स्वागतासाठी दारापुढे काढा आकर्षक अन् सुंदर रांगोळी; पाहा या सोप्या डिझाईन्स

जगभरातील राम भक्त 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खूप उत्सुक आहे. यादिवशी देशभरात दिवाळीचं वातावरण असणार आहे. यादिवशी प्रत्येक घरात रामाची पूजा आणि दिवे लावण्यात येणार आहे.

आजकाल आपण सजावटीसाठी अनेक गोष्टींची मदत घेतो. कोणताही सण किंवा शुभ समारंभ आला की आपण घराच्या वेगवेगळ्या भागात रांगोळी काढतो. आज आम्ही तुम्हाला रांगोळीच्या डिझाइन्स दाखवणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या घराच्या वेगवेगळ्या भागात चमच्याने, थाळीच्या मदतीने सहज बनवू शकता.

प्रभू श्रीराम रांगोळी डिझाइन

जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढायची असेल तर या प्रकारची फ्लोरल डिझाइन रांगोळी तुमच्यासाठी योग्य असेल. यासाठी तुम्हाला 4 ते 5 रंगांचे कलर कॉम्बिनेशन निवडावे लागेल. फुलांच्या कळ्या काढण्यासाठी माचीस वापरा.

Lord Ram Rangoli Designs : रामलल्लाच्या स्वागतासाठी दारापुढे काढा आकर्षक अन् सुंदर रांगोळी; पाहा या सोप्या डिझाईन्स
Ayodhya Ram Mandir : पुण्य पदरात पाडून घेण्याचा उद्या महत्त्वाचा दिवस, श्री राम विराजमान होतील तेव्हा नक्की करा या गोष्टी

जर तुम्ही रांगोळी काढण्यात एक्सपर्ट असाल आणि तुमच्या घरातील मंदिरात वेगवेगळ्या रंगांच्या साहाय्याने रांगोळी काढण्याचा विचार करत असाल, तर अशा प्रकारे तुम्ही प्रभू श्रीरामाचे चित्र देखील बनवू शकता

जर तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणात श्रीराम मंदिराची झलक दाखवायची असेल तर तुम्ही गोल आकारात डिझाईन बनवू शकता. चमचा किंवा माचीस वापरून त्यास योग्य आकार देऊ शकता. चित्राप्रमाणे तुम्ही श्री राम मंदिर बनवू शकता आणि श्री राम लिहू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बॉर्डरसाठी रंगीबेरंगी फुलेही बनवू शकता. हे करण्यासाठी, आपण प्लेटची मदत घेऊ शकता.

जर तुम्हाला रांगोळीची सोपी आणि सुंदर डिझाईन काढायची असेल तर अशा प्रकारे धनुष्य बाणाची डिझाईन काढू शकता. त्यामध्ये 'जय श्री राम' असं देखील लिहू शकता. त्यासाठी पांढरा आणि भगवा या दोन रंगांच्या मदतीने ते बनवण्याचा प्रयत्न करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com