esakal | Work From Home चे दुष्परिणाम; ६ टीप्समुळे दूर होतील शारीरिक समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

work from home handle home work and health

Work From Home चे दुष्परिणाम; ६ टीप्समुळे दूर होतील शारीरिक समस्या

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेली कोरोनासोबतची लढाई अद्यापही सुरुच आहे. आता भारतात दुसरी लाट पसरली असून पुन्हा एकदा संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन प्रशासन व डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. मात्र, घरी राहून काम करत असतांनादेखील नागरिकांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरं जाव लागत आहे. सर्वात प्रथम कामाचं अनियमित वेळापत्रक आणि वाढीव कामाचे त्रास याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे या काळात निर्माण होणाऱ्या शारीरिक त्रासाकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणूनच, या काळात निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या कोणत्या व त्यावरील उपाय कोणते ते पाहुयात.

१. स्नायुंमध्ये होणा-या वेदना -

काम करतांना बसण्याची अयोग्य पद्धत, टेबल किंवा खुर्चीचा वापर न करणे, बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे यामुळे स्नायुंमध्ये वेदना होऊ शकतात. यात पाठदुखी, कंबरदुखी,हात किंवा पाय दुखणे यासारखे त्रास जाणवू शकतात. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी सर्वात प्रथम बसण्याची योग्य पद्धत ठरवा. पलंगावर बसू नका. टेबल खुर्चीचा वापर करता ज्यामुळे पाठीचा कणा ताठ राहिल.

हेही वाचा: ना कुटुंबाची भेट, ना सुट्टी; वर्षभरापासून सातत्याने रुग्णसेवा करणारा 'देवदूत'

२. डोळ्यांवरील ताण -

सतत लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. ज्यामुळे अंधुक दृष्टी, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे लॅपटॉपवरील काम संपल्यावर लगेच तो बंद करा. तसंच लगेचच मोबाईलमध्ये पाहत बसू नका. डोळ्यांना विश्रांती द्या.

३. कानाचे आरोग्य -

आपल्याला व्हिडिओ कॉल्सद्वारे किंवा फोन कॉलद्वारे ऑनलाईन मिटींगमध्ये उपस्थित रहावे लागत असेल तर इअर फोनचा वापर करावा. आवाजाची पातळी कमी ठेऊन कानांच्या पडद्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

४. तणाव -

वर्क फ्रॉम होम करत असताना सतत घरात कोंडल्यामुळे अनेक जण नैराश्यासारख्या समस्याना सामोरं जात आहेत. कामाचा ताण, बाहेर बिघडलेली परिस्थिती यासगळ्याचा विचार करुन अनेकांवर मानसिक ताण निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात कुटुंबियांशी, मित्र-परिवाराशी जास्तीत जास्त संवाद साधा.

५. वजन वाढणे -

बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे आपल्याला आरोग्याला घातक ठरू शकतो. व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा, हृदयरोग तसेच मधुमेहासारखा आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे काम करतांना अर्ध्या तासाचा ब्रेक घेऊन घरातल्या घरात एक फेरफटका मारा.

६. अपुरी झोप -

व्यस्त वेळापत्रक आणि गॅजेट्सचा अतिवापर आरोग्यास हानीकारक ठरतो. अपुर्‍या झोपेमुळे तुमचे मानसिक स्वास्थ बिघडू शकते तसेच मन एकाग्र करणे देखील कठीण होऊ शकते.

घरून काम करताना 'या' टीप्स वापरा

१. न चूकता दररोज व्यायाम करा. आपण तणावमुक्त राहण्यासाठी आणि औदासिन्यापासून मुक्त होण्यासाठी एरोबिक्स, इमारतीच्या आवारात सायकल चालविणे, घरच्या घरी चालणे, योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन सारखे पर्याय निवडू शकता.

२.एकाकीपणा दूर करण्यासाठी, आपल्या कुटुंबातील आणि मित्रांसह आपल्या भावनांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा.

३. संतुलित आहाराचे सेवन करा. फळे, भाज्या, शेंगदाणे, बियाणे, शेंगा, डाळी आणि संपूर्ण धान्य खाण्याचा प्रयत्न करा. कार्बोनेटेड पेय, शर्करायुक्त पेय, अल्कोहोल किंवा जास्त प्रमाणात कॅफिन घेऊ नका. धूम्रपान करू नका, मसालेदार, तेलकट आणि जंक फूड हे आपल्याला इष्टतम वजन टिकवून ठेवण्यास मदत करेल.

४. घरातून काम करताना आसनव्यवस्थेकडे दुर्लक्ष करू नका. पाठीच्या कण्याला आराम देणारी खुर्ची वापरा. पाठदुखीचा सामना करण्यासाठी थोड्या थोड्या अंतराने उभे रहा. अधुन मधुन स्ट्रेचिंग करा आणि गॅझेट्सचा वापर मर्यादित करा आणि घरात गॅझेट-मुक्त झोन तयार करा.

५. कानाच्या समस्या दूर करण्यासाठी गॅझेटचा आवाज कमी करा आणि फोनचा अतिवापर टाळा.

६. कामाच्या दर 20 मिनिटांनंतर ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा आणि 20 सेकंद पर्यंत आपल्यापासून 20 फूट अंतरावर असलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा आणि मॉनिटरसाठी अँटी-ग्लेअर स्क्रीन वापरा आणि डोळ्यांच्या कोरडेपणा टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजन करा.

७. कमीत-कमी 8 तास शांतपणे झोप. पुरेशी झोप आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करेल.

(डॉ. तुषार राणे हे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट आहेत.)

loading image
go to top