esakal | ना कुटुंबाची भेट, ना सुट्टी; वर्षभरापासून सातत्याने रुग्णसेवा करणारा 'देवदूत'

बोलून बातमी शोधा

ना कुटुंबाची भेट, ना सुट्टी; वर्षभरापासून सातत्याने रुग्णसेवा करणारा 'देवदूत'
ना कुटुंबाची भेट, ना सुट्टी; वर्षभरापासून सातत्याने रुग्णसेवा करणारा 'देवदूत'
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांना या विषाणूची लागण झाली असून प्रशासन व वैद्यकीय कर्मचारी वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेl. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून प्रशासन व डॉक्टर फ्रंटलाइनवर काम करत आहे. यामध्येच उत्तराखंड एका डॉक्टरांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेत वाहून दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे हे डॉक्टर गेल्या एक वर्षांपासून एकही सुट्टी न घेता सातत्याने काम करत आहेत. इतकंच नाही तर या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचीदेखील भेट घेतलेली नाही.

उत्तराखंडमधील एका मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर चंचल सिंह मारछाल हे गेल्या वर्षभरापासून एकाही दिवसाचा खंड न पडू देता सातत्याने कोरोनाग्रस्तांची सेवा करत आहेत. या मेडिकल कॉलेजमध्ये सध्या कोविड सेंटर उभारण्यात आलं असून येथे रुग्णांची कोरोना चाचणी करण्यापासून त्यांच्यावर उपचार करण्यापर्यंत सगळ्याची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोरोना काळात पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळवायची? वाचा 6 टीप्स

चंचल सिंह मारछाल हे पिथौरागढमधील धारचूला या गावाचे रहिवासी असून ते वर्षभरात एकदाही गावी गेले नाही. विशेष म्हणजे होळी व दिवाळी या सणांच्या दिवशी रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी एक दिवसाची सुट्टी घेऊन कुटुंबियांची भेट घेतली. मात्र, मारछाल त्या काळातही त्यांची सेवा बजावत होते.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर डॉ. मारछाल यांच्या कार्याची चर्चा होत असून अनेकांनी त्यांना सलाम केलं आहे. विशेष म्हणजे रुग्णांची सेवा करणं हे सध्याच्या काळात माझं पहिलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.