नवसंकल्पाची नवी गुढी

गुढीपाडवा म्हणजे केवळ नववर्षाची सुरुवात नव्हे, तर आत्मविकासाचा संकल्पही आहे. आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवून मनोबळ मजबूत करण्याचा हा दिवस आहे.
Gudi Padwa
Gudi Padwa Sakal
Updated on

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

उद्या गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन संकल्प, नवीन उमेद. गुढीपाडव्याला आपण आनंदाने व श्रद्धेने गुढी उभी करतो. ही गुढी म्हणजे नवचैतन्याची गुढी. गुढीला ‘इंद्रध्वज’ असेही म्हणतात. इंद्रध्वज याचा प्रतीकात्मक अर्थ असा, की आपल्या इंद्रियांवर विजय प्राप्त करणे, व आपल्या षड्रिपूंवर विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. म्हणजे गुढी उभारण्यामागचा एक संकेत असाही होतो, की आपण स्वतःसाठी नवीन संकल्प घ्यावा, की ‘मी माझ्या मनातील षड्रिपूंवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’ असा हा संकल्प आजच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप मोलाचा ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com