कोरोनामुळे पार्लरमध्ये जायची भीती वाटतेय? मग घरीच 'असे' तयार करा 'शुगर वॅक्स'

simple sugar wax by using home ingredients nagpur news
simple sugar wax by using home ingredients nagpur news

नागपूर : कोरोना महामारीमुळे अनेक दुकाने, व्यवसाय बंद होते. त्याचा फटका अनेकांना बसला आहे. याच महामारीमुळे सॅलोन देखील बंद झाले. त्यातच आपल्या हात, पायांवरील केसांची वाढ फार लवकर होते. एक महिना जरी वॅक्सींग केले नाही, तर केसाळलेले दिसायला लागतो. पण, पार्लर बंद झाल्यामुळे आपल्याला घरगुती उपायांशिवाय पर्याय उरला नाही. त्यासाठी आज आपण वॅक्स घरीच कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या वॅक्समुळे केस मुळांपासून निघण्यास मदत होते. हे वॅक्स तयार करण्यासाठी फक्त तीनच गोष्टींची गरज असते आणि ते देखील आपल्या घरात सहज उपलब्ध होतात. 

साहित्य -
एक कप साखर
1/4 कप लिंबाचा रस
1/4 कप पाणी
किचन थर्मामीटर
एक छोटा ग्लास जार
सॉस पॅन

कृती -
साखर पॅनमध्ये घाला. त्यामध्ये पाणी आणि लिंबू घालू मिश्रण चांगल्याने ढवळा. यावेळी गॅस मीडियम-हाय फ्लेमवर ठेवा. यामुळे साखर जळेल. मिश्रणाला वेळोवेळी ढवळा. मिश्रणाला मधाचा रंग येतपर्यंत शिजवा. त्यानंतर किचन थर्मामीटरच्या सहाय्याने त्याचे तापमान मोजा. जर त्या मिश्रणाचे तापमान 240 डिग्री F असेल तर मिश्रण शिजवणे थांबवा. त्यानंतर हे मिश्रण थंडे करा. त्यानंतर हातांवर पाणी लावून मिश्रण हाताने ढवळा. मिश्रण पारदर्शी होतपर्यंत त्याला ढवळत राहा. त्यानंतर त्याचा एक बॉल तयार करा. 

कसा कराला वापर -
शुगर वॅक्सींग नॉर्मल वॅक्सींगसारखीच केली जाते. मात्र, हे काढताना वॅक्स स्ट्रीपची गरज पडणार नाही. मिश्रण हातांवर लावल्यानंतर त्याला कोरडे पडू द्या. त्यानंतर ते ओढल्यावर केस मुळासकट निघतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com