
थोडक्यात:
दिवसभराची धावपळ आणि जबाबदाऱ्या मनाला पूर्ण थकवतात.
स्वतःच्या गरजा आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष केल्याने चिडचिड व ताण वाढतो.
थकव्याची पातळी इतकी वाढते की लहान गोष्टींनाही भावनिक प्रतिक्रिया येते.
Simple Ways to Avoid Mental Burnout: आपलं रोजचं आयुष्य म्हणजे एक न संपणारी ‘To-Do’ लिस्ट! सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा उशीवर डोकं ठेवेपर्यंत जरा तरी थांबतो का? नाही. आपण चालत राहतो. थोडं नाही, तर मनाची गाडी अगदी ‘रिझर्व्ह’वर येईपर्यंत!
म्हणजे काय? तर सकाळपासून काही खाल्लं नाहीये, चिडचिड होतेय; पण मुलांच्या गृहपाठाचं टेन्शन अधिक. झोप नीट झालेली नाही, डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिस होतेय; पण ऑफिसच्या प्रेझेंटेशनमधली एक स्लाइडसुद्धा कमी होता कामा नये. कधी तर आपण इतके ‘खाली गेलेलो’ असतो, की एखाद्या साध्या प्रश्नावरही रडू कोसळतं.