उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरील पुरळ कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी या गोष्टी करा 

skin before bed to reduce facial acne in summer tips lifestyle marathi news
skin before bed to reduce facial acne in summer tips lifestyle marathi news
Updated on

कोल्हापूर :  चेहऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करताना सुरुवातीस आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.  उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्वचा तेलकट झाल्यामुळे त्याचबरोबर त्या ठिकाणी पुरळची समस्या निर्माण होते. तेलकट चेहऱ्या शिवाय सर्वसाधारण त्वचेवरही उन्हाळ्यामध्ये पुरळ समस्या निर्माण होते. जर पुरळ समस्या कायम असेल तर त्यासाठी अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये हार्मोन्स, मानसिक तणाव अथवा सौंदर्य प्रसाधने हीसुद्धा शक्यता असते.


उन्हाळ्यामध्ये पुरळ समस्या पासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमित उपाय योजना करणे गरजेचे आहे. अनेक वेळा झोप पूर्ण न झाल्यामुळे पुरळची समस्या निर्माण होते. झोप ही आपल्या शरीरातील हार्मोन्सचे निर्मिती वाढवते. जे शरीरातील पेशी रिपेअर करतात त्याच बरोबर पेशी निर्मितीचे कामही करतात. याशिवाय आपल्या शरीरामध्ये कोलेजन चे उत्पादन नियमित ठेवण्यासाठी त्याची मदत होते. ज्यामुळे त्वचा  मध्ये समस्या निर्माण होत नाही आणि त्वचा नेहमी उजळ दिसते.

रात्री झोपताना नेहमी आपले केस बांधून ठेवण्याचा सल्ला देतात. हे यासाठी की केसाची समस्या आपल्या त्वचेवर नवी समस्या निर्माण करू नये .जर तुमची केस लहान असतील तर तेसुद्धा बांधून ठेवावे .जेणेकरून हे केस आपल्या चेहऱ्यावर येणार नाहीत. अनेक वेळा केस तेलकट असतील तर हे केस चेहऱ्यावर येतात.यामुळे आपल्या चेहऱ्यावर पुरळ उठतात. जास्त करून अनेक महिला दररोज आपले केस धुत नाहीत. अशामुळे त्वचेचे ही नुकसान होते. यासाठी झोपण्यापूर्वी आपले केस चांगल्या पद्धतीने पिन लावून बांधून ठेवावे.

फक्त फेसवॉश नाही मसाज ची पण गरज 
 रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा केवळ धुऊन चालणार नाही तर त्यासाठी अधिक काळजी घेण्याचीही आवश्यकता आहे. मेकअप आणि धूळ चेहऱ्यावरील काढून टाकण्यासाठी लाईट मॉइश्चरायझर  चा वापर जरूर करा. याशिवाय तुम्ही नॅचरल ऑइल च्या माध्यमातून आपल्या चेहऱ्याला मसाज करू शकता. यामुळे त्वचेची थकावट दूर होते. त्याच बरोबर झोपही चांगली लागते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर झोपण्यावेळी चेहऱ्यावर अधिक तेल असू नये याची काळजी घ्या.

बेडशीट आणि उशी नेहमी बदला

झोपण्यापूर्वी तुमची खुशी आणि बेडशीट नेहमी स्वच्छ ठेवा. केवळ उशीचे कव्हरच नव्हे तर बेडशीट  दोन किंवा तीन दिवसातून जरूर बदला.  झोपण्यापूर्वी आपले बेडशीट चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. बेडशीट वरील धुळीमुळे चांगल्या पद्धतीने झोप येत नाही. त्याचबरोबर त्याचीशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.  चेहऱ्यावर  तेलकटपणा उशी आणि बेडशीट ला लागते. यामुळे बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे बेडशीट आणि उशी धुतल्यानंतर त्वरित  उन्हामध्ये मध्ये घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com