esakal | नवरात्रात साबुदाणाच्या मदतीने घ्या त्वचेची काळजी! घरीच पार्लरप्रमाणे चमकू शकता
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रात साबुदाणाच्या मदतीने घ्या त्वचेची काळजी! घरीच पार्लरप्रमाणे चमकू शकता

नवरात्रात साबुदाणाच्या मदतीने घ्या त्वचेची काळजी! घरीच पार्लरप्रमाणे चमकू शकता

sakal_logo
By
ज्योती देवरे

चैत्र नवरात्रास सुरूवात झाली आहे आणि यादिवसात साबुदाण्याला किती महत्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपण बर्‍याचदा खाण्यासाठी साबुदाणा वापरतो. परंतु आपल्याला माहित आहे का? की आपण त्वचेच्या काळजीसाठी त्याचा कसा वापर करू शकतो? होय, साबुदाणा त्वचेच्या सौंदर्यासाठी सुध्दा सहजपणे वापरला जाऊ शकतो..कसे ते वाचा...साबुदाणाच्या मदतीने आपण अगदी सहज फेस पैक बनवू शकतो आणि आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु साबुदाणामध्ये त्वचा सुधारण्यास मदत करणारी अनेक वैशिष्ट्ये आहेत... कसे ते वाचा..

.

साबुदाणा पॅक

1 चमचे साबूदाणे, 1-2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचे साखर, 1 चमचे मुलतानी माती, 2 चमचे गुलाब पाणी

एका भांड्यात भिजलेला साबूदाणा घ्या आणि त्यात लिंबाचा रस घालावे आणि नंतर ते ग्राइंडरमध्ये ठेवून त्याची पेस्ट बनवा. त्यात साखर घाला आणि ग्राईंड करताना मुलतानी माती आणि गुलाब पाणी घाला. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटे सोडून द्या. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा ते पाण्याने धुवा आणि इच्छित असल्यास, मृत त्वचा काढून टाकण्यासाठी हलके हातांनी चेहऱ्यावर मालिश करा. स्वच्छ टॉवेलने पुसून टाका आणि नंतर भरपूर मॉइश्चरायझर लावा

ऑईली त्वचेसाठी साबुदाणा पॅक

1 चमचा भिजलेला साबूदाणा, 1 चमचा मुलतानी माती, 1 चमचा गुलाब पाणी

सर्व साहित्य मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे आपल्या चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने थंड पाण्याने धुवा. हे पॅक आपल्या चेहर्‍यावरील एक्सट्रा ऑईल काढून टाकेल.

कोरड्या त्वचेसाठी साबुदाणा पॅक

1 चमचा भिजलेला साबूदाणा, अर्धा चमचा एलोवेरा जेल, 1 चमचा गुलाब पाणी, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

भिजवलेले साबुदाणे मॅश करा. या व्यतिरिक्त, अर्धा चमचे एलोवेरा जेल, 1 चमचे गुलाब पाणी, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल तेल मिक्स करावे आणि हा पॅक 15 मिनिटांसाठी चेहर्‍यावर लावावा. कोमट पाण्याने धुवा. ते लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते आणि अशा लोकांसाठी साबुदाणा चांगला असतो व हिवाळ्यात हे त्वचेतील कोरडेपणा दूर करते आणि मॉइश्चरायझेशन राखते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image