Healthy Skin: या 3 टिप्स करा फॉलो, त्वचा राहिल फुलांप्रमाणे नाजूक

बदलत्या ऋतूत त्वचेशी संबंधित समस्या येणे सामान्य आहे.
Skin
Skinsakal
Updated on

Skincare Tips : बदलत्या ऋतूत त्वचेशी संबंधित समस्या येणे सामान्य आहे. पावसाळ्यात त्वचा तेलकट होते. त्यामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या इतर प्रकारच्या समस्या होऊ लागतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आयुष्यभर आपली त्वचा एकसारखी राहत नाही. त्यात वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बदल होऊ शकतात. विशेषतः जर त्वचा नाजुक असेल तर थोड्याशा बदलानेही यावर एक्ने, आग होणे किंवा अन्य प्रकारचे ईन्फेक्शन होऊ शकते.

त्वचा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग असून तो फार नाजुक असतो. म्हणून त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काहींची त्वचा कोरडी, काहींची ऑयली तर काहींची कॉम्बिनेशन असते. तसेच काहींची फारच नाजुक असते. त्यामुळे थोड्याही बदलावर लगेच रिॲक्ट करते.

Skin
Kitchen Hacks: सकाळी स्वयंपाकाची घाई होतेय? मग या टिप्स वापरा आणि लवकर आवरा

तर चला जाणून घेऊया संवेदनशील किंवा नाजुक त्वचेची काळजी कशी घ्यावी.

सनस्क्रीनचा वापर नक्की करावा

सूर्य किरणांमधून निघणारे यूवी किरणे त्वचेला मोठ्याप्रमाणात नुकसान पोहचवतात. ज्यामुळे त्वचा लाल होणे, खाज येणे, कोरडी होणे असे त्रास होतात. त्यामुळे सनस्क्रीन लावणे फार आवश्यक असते. सर्व त्वचा प्रकाराच्या लोकांनी सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.

त्वचेला प्रदुषणापासून वाचवा

त्वचेची आग होणे यामागे अनेक पर्यावरणीय कारणे असतात. त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसातून कमीतकमी दोन वेळा चेहरा धुवावा. यामुळे त्वचाशी निगडीत समस्यांना कारणीभूत असणारी घाण, किटाणू आणि अशुध्दी यामुळे निघून जाते.

Skin
Spoon For Beauty : घरातला एक साधा चमचाही वाढवू शकतो तुमचे सौंदर्य, कसं? जाणून घ्या

स्कीन केअर प्रॉडक्टस निवडताना काळजी घ्या

स्कीन केअर प्रॉडक्टसमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याचा थेट परीणाम त्वचेवर होतो. ज्यामुळे त्वचेवर एक्ने, आग होणे एवढेच नव्हे तर सूज येते. यासाठी चांगल्याप्रतीचे नैसर्गिक आणि ऑरगॅनिक प्रॉडक्टस निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com