Skin Care Tips : सुरकुत्या, पिंपल्स आणि टॅनची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आहे फायदेशीर... अशा प्रकारे करा वापर

लिंबू वापरून तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक बनवू शकता. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही लिंबाचा वापर करून कोणते फेस पॅक बनवू शकता.
Skin care
Skin careSakal
Updated on

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लिंबू आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबाचा दररोजच्या आहारामध्ये समावेश केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. इतकेच नाहीतर लिंबू हे आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे.

तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा समावेश करू शकता. लिंबू वापरून तुम्ही अनेक प्रकारचे फेस पॅक बनवू शकता. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही लिंबाचा वापर करून फेस पॅक बनवू शकता.

1. लिंबू आणि मध फेस पॅक

लागणारे साहित्य

  • 1 चमचा लिंबाचा रस

  • 1 चमचे मध

  • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

बनवण्याची पद्धत:

  • एका भांड्यात लिंबाचा रस, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल आणि मध टाकून चांगले मिसळा.

  • आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.

  • नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवू शकता.

Skin care
Monsoon Skin Care Tips : पावसाच्या पाण्यामुळे तुमची त्वचा टॅन झालीय? मग 'या' सोप्या पद्धतींनी चेहऱ्याचे टॅनिंग काढून टाका

2. लिंबू, हळद आणि दुधाचा फेस पॅक

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून लिंबाचा रस

  • चिमूटभर हळद

  • 1 चमचा गव्हाचे पीठ

  • 1 चमचा दूध

बनवण्याची पद्धत

  • लिंबाचा रस, गव्हाचे पीठ, दूध आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवा.

  • आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा.

  • यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

3. लिंबू आणि एलोवेरा जेल फेस पॅक

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून लिंबाचा रस

  • 1 टीस्पून एलोवेरा जेल

बनवण्याची पद्धत

  • लिंबाचा रस आणि एलोवेरा जेल मिक्स करून पेस्ट बनवा.

  • ते चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.

  • यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

4. लिंबू, दूध आणि बेसनाचा फेस पॅक

लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून लिंबाचा रस

  • 2 चमचे बेसन

  • 1 चमचा दूध

बनवण्याची पद्धत

  • लिंबाचा रस आणि बेसन एकत्र करून पेस्ट बनवा. पेस्ट घट्ट झाली तर थोडे दूध घाला.

  • चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच ठेवा.

  • कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com