काय आहे skin icing जी तुमच्या त्वचेला ग्लो आणते

स्किन आईस मुळे त्वचेवर येतो उजळपणा
काय आहे skin icing जी तुमच्या त्वचेला ग्लो आणते

कोल्हापूर : त्वचा केस आणि शरीरासाठी घरांमध्येच अनेक उपाययोजना आहेत. यामुळे आपण सहजपणे घरात हे उपचार करू शकतो. यातीलच एका उपचाराबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत जे त्वचेसाठी फायदेशीर असते आणि ते म्हणजे स्किन आइसिंग होय. आपल्या चेहऱ्यावर बर्फाच्या माध्यमातून केलेल्या मसाजमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या तेलकट चेहऱ्यावर त्याचबरोबर चेहऱ्यावर उठणाऱ्या मोडी बाबत हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो.

काय आहे स्किन आइसिंगस्किन

आइसिंग याला काय रो थेरपी असे म्हटले जाते. ही उपचार पद्धती अनेक स्पामध्ये त्वचेवरील उपचारासाठी वापरली जाते. याला आईस स्पेशल या नावानेही ओळखले जाते. यामध्ये वेफरआईजड नायट्रोजन चा उपयोग केला जातो. जे मानेवरील त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

बर्फ काही मिनिटांसाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या शरीराच्या भागावर ठेवले तर त्या ठिकाणी रक्तवाहिन्या चांगल्या काम करू शकतात आणि आपल्या चेहऱ्याला एक वेगळेपण येते. परंतु योग्य पद्धतीने उपचार केले तरच आपल्याला ते फायदेशीर ठरते. आपण या ठिकाणी बर्फाच्या माध्यमातून चेहऱ्यावर मसाज कशा पद्धतीने करता येते ही माहिती घेऊया.

कृती:

आपला चेहरा चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. त्याचबरोबर चेहऱ्यावर तेलकटपणा असेल तर तो काढून टाका. एका कापडामध्ये बर्फाचे तीन ते चार तुकडे ठेवा. जेव्हा ते थोडीशी विरघळेल तेव्हा ते मसाज साठी वापरा. चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर मसाज करा. मसाज करताना नेहमी गोलाकार आकाराने उपचार करा. चेहरा सुकल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा. दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मॉइश्चरायझर ठेवू नका अन्यथा आपली त्वचा कोरडी होईल आठवड्यातून दोन वेळा आपण अशा पद्धतीने बर्फ द्वारे मसाज करू शकतो. तुम्ही यामध्ये काही नैसर्गिक घटक घालून आणखीन परिणामकारक हा उपचार बनवू शकता.

एलोवेरा आईस :

क्यूबएलोवेराच्या पानातील मधीला गाभा काढा. तो चांगल्या पद्धतीने बारीक करा आणि पाण्याबरोबर मिक्स करून ते फ्रिज मध्ये ठेवा. तुम्हाला वाटले तर याचा थेट उपयोगी तुम्ही करू शकता. एलोवेरा मध्ये ऑंटी अक्सिडेंट आणि विटामिन असतात. जे त्वचेच्या समस्येवर चांगले उपाय ठरू शकतात.

ग्रीन टी आईस क्यूब

ग्रीन टी तयार करा आणि ते फ्रिजमध्ये आईस्क्रीम च्या ट्रेमध्ये ठेवा. ग्रीन टी मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि ऑंटी इम्प्लिमेंट गुण असतात जे आपल्या त्वचेला फायदेशीर ठरतात.

हळद आईस क्यूब

हळदीमध्ये जीवाणू विरोधी गुण असतात. जे चेहर्‍यावरील पिंपल्स, काळे डाग कमी होण्यासाठी मदत करतात. आपण पाण्यामध्ये हळद टाकून त्याचेआईस क्यूब करून चेहऱ्यावरसुद्धा लावू शकतो.

कॉफी आईस क्यूब

कॉफी मध्ये ऑंटी एक्सीडेंट गुण असतात हे आपल्या डोळ्याच्या खाली निर्माण होणाऱ्या काळ्‍या सर्कल ला कमी करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर चेहऱ्यावर लालसर डाग अथवा रेषा असतील तरी त्या कमी होतात. आपण पाण्यामध्ये कॉफी टाकून त्याचे आईस क्यूब तयार करू शकतो आणि ते मसाज साठी वापरू शकतो.

काय आहेत स्किन आईस चे फायदे

तुम्ही अधिक थकला आहात हे डोळ्यावरून दिसून येते. त्याचबरोबर आपली झोप जर पुरेशी झाली नसेल तर डोळे चर चर करू लागतात. या समस्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण आईस क्यूब एका कपड्यांमध्ये घालून डोळ्यावर ठेवू शकतो. त्याचबरोबर हलकेसे मसाज करु शकतो. आपण एकदम थंड पाणी घेऊन कापसाच्या गोळ्या मार्फत हलकेसे मसाज करू शकतो. आणि डोळ्याला थंडावा देऊ शकतो.

ब्लड सर्कुलेशन साठी उपाय कारक

बर्फाचे कमी असलेले तापमान आपल्या रक्तवाहिनीतील रक्त प्रवाह कमी करण्यासाठी मदत करते आणि त्वचेच्या खाली असलेल्या रक्ताचे प्रमाण कमी होते. हळू हळू बर्फाचा भाग ज्या ठिकाणी लावला आहे त्या ठिकाणचे पेशी गरम होण्यासाठी प्रयत्न करू लागतात. त्यामुळे आपला रक्त प्रवाह व्यवस्थित होतो. यामुळे चेहऱ्यावर असलेला थकावट कमी होतो.

सन बर्ग वर उपाय

जास्त काळ उन्हामध्ये राहिल्यामुळे सन बर्ग ची समस्या आपल्याला होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तसेच अन्य भागावर उष्णतेचा त्रास होऊ लागतो. अशावेळी आईसिंग हा एक अत्यंत प्रभावी उपचार ठरतो. यामुळे लगेच चेहऱ्यावर ज्या ठिकाणी उन्हाच्या प्रखर किरणाने त्रास होत असतो तो कमी होतो एलोवेरा आईस क्यूब वापरल्यामुळे आपल्याला अधिक थंडावा ही मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com