Google Map मुळे रस्त्यावरील अपघात, चालान कापण्यापासून वाचाल! जाणून घ्या फिचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Maps
Google Map मुळे रस्त्यावरील अपघात, चालान कापण्यापासून वाचाल! जाणून घ्या फिचर्स

Google Map मुळे रस्त्यावरील अपघात, चालान कापण्यापासून वाचाल! जाणून घ्या फिचर्स

गुगल मॅप्समुळे कुठेही प्रवास करणे अतिशय सोपे झाले आहे. फार शोधाशोध न करता हव्या त्या ठिकाणी मॅपमुळे सहज पोहाचता येतं. त्यामुळे लोकांचा वेळही खूप वाचला आहे. पण गुगल मॅप अपघात (Accident) होण्यापासून तसेच चालान कापण्यापासून वाचवू शकतो. पण, अनेकांना या फिचरविषयी फारशी माहिती नाही. तुम्ही खालील पद्धतीने हे फिचर अॅक्टीव्ह करू शकता.

हेही वाचा: महिलांनो, गर्भपातापासून लिव्ह इनपर्यंत तुम्हाला माहिती हवेत 'हे' दहा कायदे

गुगल मॅप्स स्पीड लिमिट वॉर्निंग

गुगल मॅप्सच्या या फिचरचं नाव स्पीड लिमिट वॉर्निंग वॉर्निंग (Speed Limit Warning) असे आहे. गाडी चालवण्याच्या दरम्यान तुम्ही जेव्हा वेगाने जाता तेव्हा स्पीड लिमिट ओलांडण्याची शक्यता निर्माण झाल्यास हे फिचर तुम्हीला एलर्ट करते. तुमच्या गाडीचा वेग ठरलेल्या-निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे हे फीचर तुम्हाला सांगेल. त्यामुळे मर्यादेत वाहन चालविल्यास दुर्घटना टळू शकतात. तसेच शहरात अनेक ठिकाणी स्पीड कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याद्वारे ओव्हरस्पीड वाहनांचा फोटो क्लिक करुन आपोआप चालान त्या कार चालकाच्या घरी पाठवलं जाते. पण हे फिचर चलान काटण्यापासून वाचवते. तसेच गाडी ओव्हरस्पीड झाल्यावर गुगल मॅपचा स्पीडोमीटर रंग बदलतो आणि धोक्याची सूचना देतो. हा बदलणारा रंग तुमच्या स्क्रिनवर ट्रॅव्हल टाइम ड्युरेशनच्या वर उजव्या कोपऱ्यात स्पीड लिमिट सेक्शनमध्ये दिसेल.

हेही वाचा: Google Map वरची ठिकाणं शोधा; भरपूर पैसे मिळवा!

google map

google map

अशाप्रकारे करा एक्टीव्ह

स्पीड लिमिट टूलचा वापर करण्यासाठी गुगल मॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपटेट करणे गरजेचे आहे. ते झाल्यावर गुगल मॅप ओपन करा. उजव्या बाजूला प्रोफाईल आयकॉनवर जा. सेटिंग पर्यायवर जाऊन Navigation Settings वर क्लीक करा. स्पीड लिमिट बटण ऑन करा. ते ऑन केल्यावर स्पीडोमीटर फिचर काम सुरू करेल. तुम्हाला याबाबत नोटिफिकेशनही पाठवले जाईल.

हेही वाचा: युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!

Web Title: Google Maps Latest Updates Google Maps Will Save From Accidents And Challan Know How To Activated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :accidentTollGoogle map