Z Sleep Care Equipment : नीट झोप येत नाही? तर वापरा ‘झेड स्लिप केअर’ यंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेड स्लिप केअर यंत्र

Startup : नीट झोप येत नाही? तर वापरा ‘झेड स्लिप केअर’ यंत्र

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : जगातील ६० टक्‍क्यांपेक्षा जास्त लोकांना झोपेबाबत अनेक समस्या आहेत. व्यवस्थित झोप येत नसल्यामुळे शरीराला अन्य व्याधी जडतात. अनेकदा या समस्येचे नेमके कारण लक्षात येत नसल्याने नागपुरातील युवकाने ‘झेड स्लिप केअर’ यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे व्याधीचे नेमके निदान होणार असल्याने त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. कुलदीप वडस्कर असे हे यंत्र तयार करणाऱ्या युवा अभियंत्याचे नाव आहे.

अनेकांना कोणताही आजार नसताना फक्त झोप येत नसल्याच्या तक्रारी असतात. कुणाला व्यवस्थित झोप येत नाही, तर कुणी झोपेतून दचकून उठतो. कधी-कधी तर पहाटेपर्यंत झोप येत नाही. अशावेळेस नेमका काय प्रॉब्लेम आहे? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. परंतु, त्यांच्या हाती निराशा येते. हीच अडचण लक्षात घेता कुलदीप वडस्कर या नागपूरकर युवा अभियंत्याने अनेक मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टरांशी चर्चा केली.

हेही वाचा: मोनालिसाचा ‘ब्लू बिकिनी’मध्ये हॉट फोटोशूट

काही दिवसांच्या अभ्यास आणि निरीक्षणानंतर ‘झेड स्लिप केअर’ यंत्राची कल्पना सुचली. त्यानुसार त्याच्या टीममधील आशिष मेश्राम, निर्मल हेडाऊ आणि शक्ती मेश्राम यांनी वर्षभरापेक्षा जास्तवेळ परिश्रम घेऊन झेड स्लिप केअर यंत्र तयार करण्यात आले. त्याच्या सध्या टेस्टिंग सुरू असून येत्या काही दिवसांतच हे यंत्र मार्केटला असेल. या छोट्याशा यंत्रामुळे झोपेविषयी असलेल्या सर्वच समस्यांचे निराकरण होणार आहे.

कसे काम करते यंत्र

झेड स्लिप केअर यंत्र हे ‘वॉच’एवढ्या आकाराचे असून झोपताना हाताच्या पहिल्या बोटावर लावावे लागते. या यंत्राद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवते. आपली बीपी, रक्तवाहिन्यांची गती, ऑक्सिजन आणि शारीरिक हालचाल याचे योग्य मूल्यमापन करून क्लाऊड डाटामध्ये साठवून ठेवते. त्यानंतर यंत्रामधील माहितीच्या आधारे मोबाईल ॲपमधून आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, याचे अचूक निदान लावल्या जाते.

हेही वाचा: Jai Bhim Movie : धमकीनंतर अभिनेता सूर्याच्या सुरक्षेत वाढ

वैद्यकीय सल्ला आणि प्लान

झेड स्लिप केअर यंत्राद्वारे लागलेल्या निदानानुसार व्यक्तीला वैद्यकीय सल्ला देण्यात येईल. मोबाईल ॲपद्वारे काही सशुल्क प्लान्स दिल्या जाईल. व्यक्तीला झोपेचे आणि मेडिसीनचे शेड्यूल्स दिल्या जातील. त्यानंतर व्यक्तीला निश्‍चितच फायदा होईल. हे यंत्र बनविण्यासाठी डॉ. राजेश स्वर्णकार, डॉ. सतीश देवपूजारी यांनी सहकार्य केले.

अनेकांना असलेल्या झोपेविषयी समस्यांचे निदान करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याला वैद्यकीय आणि तंत्राची जोड देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांच्या परीश्रमानंतर यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारे यंत्र विकसीत केल्याचे समाधान आहे.
- कुलदीप वडस्कर
loading image
go to top