Actor Threaten Surya : धमकीनंतर अभिनेता सूर्याच्या सुरक्षेत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jai Bhim Film

Jai Bhim Movie : धमकीनंतर अभिनेता सूर्याच्या सुरक्षेत वाढ

चेन्नई : चित्रपट सृष्टीत सद्या ‘जय भीम’ याच चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सूर्याच्या अभिनयाची चांगलीच स्तुती केली जात आहे. तसेच चित्रपटाला विरोधही केला जात आहे. मयिलादुथुराई पोलिसांनी सूर्याला धमकावल्याबद्दल पीएमकेच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता राजधानी चेन्नईतील सूर्याच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पट्टाली मक्कल काटची (पीएमके) या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ‘जय भीम’ अभिनेता सूर्यावर हल्ला करणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. यानंतर अभिनेत्याच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूर्याच्या चेन्नईतील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: मोनालिसाचा ‘ब्लू बिकिनी’मध्ये हॉट फोटोशूट

नुकताच प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ हा चित्रपट वन्नियार समाजाच्या चित्रणामुळे वादात सापडला आहे. सूर्याला धमकावल्याबद्दल पीएमकेच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायिलादुथुराई नगर पोलिसांनी पीएमकेचे जिल्हा सचिव सीतामल्ली पलानीस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अजामीनपात्र तरतुदींचाही समावेश आहे.

पलानीस्वामी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ‘जय भीम’मध्ये वन्नियार समाजाबद्दल दाखवलेल्या चुकीच्या चित्रणाचा विरोध केला होता. तसेच त्यांनी मायिलादुथुराई जिल्ह्यात चित्रपटाचे प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. याशिवाय चित्रपटाने पक्षाची प्रतिमा डागाळल्याचा दावाही पीएमकेने केला आहे.

हेही वाचा: ‘ती’ दिवसातून पाच ग्लास पिते स्वतःची लघवी

बजावली होते नोटीस

अभिनेता सूर्यानेही पीएमकेला चित्रपटावर राजकारण करू नये असे सांगितले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल लोकांचे आभार मानले होते. यापूर्वी वन्नियार संगमने जय भीम चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. यासोबतच त्यांनी माफी मागण्याची मागणीही केली आहे.

लोकशाही, संविधानासाठी धोकादायक

जेव्हाही पीएमके आपला राजकीय आधार गमावतो तेव्हा ते वाद निर्माण करतात. ते सूर्याला धमकवतच नाहीत तर हे लोकशाही आणि संविधानासाठी धोकादायक आहे. तामिळनाडूतील सर्व लोकशाही शक्ती पीएमकेला विरोध करीत आहेत. अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी म्हटले.

loading image
go to top