
how to keep kitchen cool in summer naturally: एप्रिल, मे महिन्यात स्वयंपाकघर अनेकदा भट्टीसारखे गरम होते. यामुळे स्वयंपाक करणे हे एक आव्हानापेक्षा कमी नसते. गॅस आणि विद्युत उपकरणांची उष्णता या सर्वांमुळे स्वयंपाकघरातील तापमान वाढते. अशावेळी प्रत्येकाला स्वयंपाकघर थंड आणि आरामदायी राहावे असे वाटते, जेणेकरून स्वयंपाक करतांना घामाचा त्रास होणार नाही तसेच चिडचिड वाढणार नाही. जर तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरातील उष्णता कमी करायची असेल तर काही सोप्या आणि भन्नाट टिप्सची मदत घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे स्वयंपाकघर उन्हाळ्यात देखील कुल राहील.