Tiffin Bag तेलकट झालीय? मग या ट्रिक वापरून स्वच्छ करा मळलेली टॅफिन बॅग

अनेकदा लंच बॅग किंवा टिफिन बॅगमध्ये भाजीचं तेल सांडतं अशा वेळी बॅग स्वच्छ कशी करावी असा प्रश्न पडतो. यासाठीच आम्ही तुम्हाला ही लंच बॅग कशी स्वच्छ ठेवता येईल यासाठी काही टिप्स देणार आहोत
टिफिन बॅग स्वच्छ हवी
टिफिन बॅग स्वच्छ हवीEsakal

ऑफिस किंवा अनेकदा शाळा कॉलेजला जाताना अनेकजण डब्यासाठी वेगळी बॅग Tiffin Bag वापरतात. तुमची पुस्तकांची स्कूल बॅग किंना ऑफिसची लॅपटॉप Laptop बॅग घाण होवू नये यासाठी वेगळी टिफिन बॅग वापरणं हा कधीही उत्तम पर्याय आहे. Smart Tips in Marathi How to Clean oil Stains on tiffin bag

मात्र रोज या टिफिन बॅगमध्ये डबा नेत असताना. तसंच रोजच्या वापरामुळे ती मळकट दिसू लागते. डब्यातील पदार्थांचं तेल Oil सांडल्याने किंवा अनेकदा लंच टाईममध्ये टेबलावरचे किंवा आपल्या हाताचं तेल किंवा इतर घाण लागल्याने ही टिफिन बॅग Tiffin Bag काही दिवसांनी तेलकट आणि मळकट दिसू लागते.

शिवाय तिला वास देखील येऊ लागतो. अशी बॅग घेऊन जाणं अनेकदा लाजीरवाणं ठरू शकतं यासाठीच लंच बॅग वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेंचं असतं. अनेकदा लंच बॅग किंवा टिफिन बॅगमध्ये भाजीचं तेल सांडतं अशा वेळी बॅग स्वच्छ कशी करावी असा प्रश्न पडतो.

तसंच भाजी किंवा इतर पदार्थांमुळे बॅगला उग्र वासही येतो. यासाठीच आम्ही तुम्हाला ही लंच बॅग कशी स्वच्छ ठेवता येईल यासाठी काही टिप्स देणार आहोत.

१. स्प्रेच्या मदतीने स्वच्छ करा लंच बॅग- जर तुमच्या लंच बॅगवर तेलाचा मोठा डाग पडला असेल तर त्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात १ चमचा लिक्विड डिटर्जंट टाका. बॉटल चांगली हलवनू त्यानंतर तेसकट डाग असलेल्या आणि अस्वच्छ भागावर स्प्रे बॉटल्याच्या मदतीने स्प्रे करा.

त्यानंतर १५ मिनिटांसाठी बॅग तशीच राहू द्या त्यानंतर पाण्याने बॅग स्वच्छ धुवा. यामुळे बॅगवरील डाग दूर होतील आणि बॅगेला येणारा वासही दूर होईल.

२. गरम पाण्याचा वापर- लंच बॅग स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू शकता. यासाठी एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. त्याच चमचाभर डिटर्जंट पावडर टाका. अर्धा तास या पाण्यामध्ये बॅग भिजत ठेवा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने बॅग स्वच्छ घासून पाण्याने धुवा. बॅग अगदी स्वच्छ निघेल.

हे देखिल वाचा-

टिफिन बॅग स्वच्छ हवी
Plastic Tiffin : प्लास्टिकच्या डब्यातील वास आणि डाग कसे घालवाल ?

३. बेकिंग सोडा- बेकिंग सोड्याच्या मदतीने टिफिन बॅग अगदी नव्या सारखी स्वच्छ होवू शकते. यासाठी एका बाऊलमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. यात अर्धा चमचा नेलपेंट रिमूव्हर टाका. हे मिश्रण एखाद्या जुन्या टूथब्रशच्या मदतीने तेलकट डागांवर आणि मळकट भागावर पसरवा.

ब्रशने बॅग चांगली स्क्रब करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे बॅगवरील डाग दूर होवून बॅग स्वच्छ होईल.

४ शॅम्पू- शॅम्पूच्या मदतीनेही बॅग अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल. यासाठी एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात. एक चमचा शॅम्पू, १ चमचा डिटर्जंट आणि १ चमचा बेकिंग सोडा टाका. या पाण्यामध्ये २० मिनिटांसाठी बॅग भिजत ठेवा.

या पाण्यात बॅग भिजवल्याने बॅगवरील तेलकट डाग, तसंच मळकटपणा दूर होवून बॅग नव्या सारखी दिसू लागेल. शिवाय बॅगेला येणारी दुर्गंधी दूर होवून त्यातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतील.

अशा प्रकारे तुम्ही लंच बॅग स्वच्छ करू शकता. त्याच प्रमाणे लंच बॅग वापरत असताना काही इतर गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे लंच बॅग घाण होणार नाही. तुम्ही वापरत असलेल्या डब्याच्या आकारानुसार किंवा तुम्ही किती डबे नेता यानुसार लंच बॅग निवडाय जास्त मोठी बॅग असल्यास डबे हलून पदार्थ सांडण्याची अधिक शक्यता असते.

तसंच लंच बॅग आतून प्लास्टिक कोटिंग किंवा वॉटरप्रूफ असल्यास ती स्वच्छ करणं अधिक सोपं होतं. शिवाय बॅग वरचेवर दर आठवड्याला धुतल्यास ती जास्त मळकट दिसणार नाही. शिवाय वासही येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com