हिवाळ्यात कपडे वाळवणे खुप अवघड असते. थंड हवा, कमी सूर्यप्रकाश आणि जास्त आर्द्रता यामुळे बाष्पीभवन मंदावते, ज्यामुळे कपडे दिवसभर ओले राहतात. परंतु योग्य ट्रिक वापरुन तुम्ही ड्रायरशिवाय हिवाळ्यात कपडे लवकर सुकवू शकता. .सर्वात वेगवान स्पिन सायकल वापराकपडे सुकण्यापूर्वी, तुमच्या वॉशिंग मशीनवरील सर्वात जास्त फिरकी सेटिंगमधून कपडे चालवा. यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते. यामुळे कपडे लवकर सुकतात. .कपडे हवेशीर ठेवाहिवाळ्यात कपडे सुकण्यासाठी पंख्याजवळ, हीटरजवळ ठेऊ शकता. तसेच खिडकीत हवा येत असेल तर तेथे कपडे सुकायला टाकावे. .Year End 2025: 'या' 5 रेसिपी वर्षभरात गुगलवर सर्वाधिक केल्या सर्च, यादी वाचून व्हाल थक्क .टॉवेल रोल ट्रिक वापराजास्त जड कपड्यांसाठी ही ट्रीक वापरावी. १. सपाट पृष्ठभागावर एक मोठा कोरडा टॉवेल ठेवा.२. ओले कपडे वर ठेवा.३. दोन्ही एकत्र घट्ट गुंडाळा. ही ट्रीक नक्की वापरा . कपडे लवकर सुकण्यास मदत मिळेल. .जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी घट्ट दाबाहिवाळ्यात कपडे लवकर सुकण्यासाठी त्यातील पाणी चांगले काढून टाकावे. यामुळे लवकर सुकतील. .प्रत्येक कपड्याच्यामधे अंतर ठेवाकपडे लवकर सुकण्यासाठी कपडे दूर अंतरावर ठेवावे. जेणेकरून हवेमुळे कपडे सुकतील. कपडे आतून बाहेर कराकपडे आतून बाहेर वळवल्याने आतील थर लवकर सुकतात आणि दुर्गंधी देखील कमी होते. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.