Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

Smartphone Durability Study: वर्षभरात ८७% लोकांच्या हातातून पडला मोबाईल; डिस्प्ले आणि कॅमेरा सुरक्षेसाठी जास्तीचे पैसे मोजायलाही ग्राहक तयार!
Why 53% Bought New Phones Early?

Why 53% Bought New Phones Early?

esakal 

Updated on

Glass Broken, Phone Changed: तुमच्याही स्मार्टफोनची स्क्रीन किंवा काच कधी फुटली आहे का ? आणि त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार केलाय? भारतातील बहुतांश मोबाईल युजर्सची हीच कहाणी आहे. डिस्प्ले क्षेत्रात आघाडीवर असलेल्या 'कॉर्निंग' (Corning Inc.) या कंपनीच्या एका नवीन अभ्यासानुसार, भारतातील तब्बल ५३% लोकांनी त्यांच्या फोनची काच फुटल्यामुळे वेळेआधीच नवीन स्मार्टफोन खरेदी केला आहे. भारतातील १,५०० हून जास्त स्मार्टफोन युजर्सवर करण्यात आलेल्या या सर्व्हेतून काही रंजक आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

वर्षभरात ८७% लोकांच्या हातातून सुटला मोबाईल!

स्मार्टफोन आता फक्त फोन राहिला नसून ते लोकांचे ऑफिस, मनोरंजनाचे साधन आणि बँक बनला आहे. त्यामुळे फोन हातातून पडल्यास लोकांना प्रचंड मानसिक त्रास होतो.

  • ८७% युजर्सनी मान्य केले की, गेल्या एका वर्षात त्यांच्या हातातून किमान एकदा तरी फोन खाली पडला आहे.

  • ५६% लोक फोन खाली पडण्याच्या भीतीने नेहमी चिंतेत असतात, कारण त्यांना फोनच्या स्क्रीनच्या टिकाऊपणाबद्दल (Durability) खात्री नसते.

  • फोनची काच फुटल्यास दर ५ पैकी एका युझरला तो फोन दुरुस्त करावाच लागतो. या दुरुस्तीसाठी जवळपास अर्ध्याहून अधिक ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com