चव अन् चर्चेसाठीचं ‘स्वयंपाकघर’

मुंबई स्वयंपाकघर हा एक फेसबुक ग्रुप आहे- ज्यामध्ये सध्या ६५ हजार सदस्य आहेत. नावात मुंबई असलं, तरी त्यामध्ये फक्त मुंबईचेच सदस्य नसून तो सर्वांसाठी आहे.
Mumbai Kitchen
Mumbai KitchenSakal

मुंबई स्वयंपाकघर हा एक फेसबुक ग्रुप आहे- ज्यामध्ये सध्या ६५ हजार सदस्य आहेत. नावात मुंबई असलं, तरी त्यामध्ये फक्त मुंबईचेच सदस्य नसून तो सर्वांसाठी आहे. साधारणतः: सहा वर्षांपूर्वी हा फेसबुक ग्रुप सुरू करण्यात आला. तो सुरू होण्याची कल्पना भक्ती चपळगावकर यांची. त्यांना ती सुचली त्यांच्या आईमुळे.

त्यांच्या आई नंदिनी चपळगावकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘स्वयंपाकघर’ नावाची एक कन्सेप्ट सुरू केली होती. घरापासून लांब राहणाऱ्या लोकांना घरच्या चवीचे पदार्थ जसे थालीपीठ, मोदक, धपाटे, पोळी भाजी या गोष्टी सहजरित्या मिळतील अशी सोय साधारण पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केली होती.

त्यावेळी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये हॉटेल्सचं प्रमाण जास्त वाढलेलं नव्हतं. जे नोकरदार किंवा विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी आलेले आहेत त्यांना घरगुती जेवणाची गरज असते. आपण रोज चमचमीत, चायनीज, पंजाबी असे पदार्थ खाऊ नाही शकत.

दुसरीकडे खानावळींमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये क्वालिटी कॉम्प्रमाइज केलेली असते. पोट भरतं; पण मन त्या जेवणानं भरत नाही. स्वयंपाकघराचा हाच मुद्दा पुढे भक्ती चपळगावकर यांनी मांडला. मुंबईतल्या लोकांसाठी घरगुती पदार्थ सहजरित्या उपलब्ध व्हावेत यासाठी फेसबुकवर हा ग्रुप त्यांनी तयार केला.

त्यामध्ये लोक रेसिपीज शेअर करतात, त्यांचे पारंपरिक पदार्थ शेअर करतात किंवा विविध विषयांवर चर्चादेखील या ग्रुपवर होत असते. ग्रुपमध्ये महिलांबरोबरच पुरुषांचाही समावेश आहे. खाद्यसंस्कृतीबद्दल आवड असणाऱ्यांनी एकत्र येऊन या ग्रुपमध्ये खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन दिलं आहे.

सुरुवातीला कुरडई, पापड, लोणची हे पदार्थ विकले जावेत या उद्देशानं सुरू झालेल्या ग्रुपची व्यापकता वाढत गेली आणि हा विषय पूर्णपणे मागे पडून महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणची वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीवर चर्चा या ग्रुपवर रंगायला सुरुवात झाली आणि आता जवळजवळ ६५ हजार सदस्यांचा हा ग्रुप बनला आहे.

अनेक पारंपरिक खाद्यपदार्थांची चव मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या लोकांना मिळतेच असं नाही. यातूनच जन्म झाला तो सुगी महोत्सवाचा. आम्ही डिसेंबर २०२३ मध्ये पहिला सुगी महोत्सव भरवला होता, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. सुगी महोत्सवाचं स्वरूप व्यापक करण्याची आमची इच्छा आहे, आमच्याकडे आजपर्यंत ज्या काही प्रमोशन पोस्ट येत असतात, त्यातून मिळणाऱ्या रकमेतून सामाजिक संस्थांना देणगी दिली जाते. कोणतीही रक्कम ग्रुपकडे ठेवली जात नाही.

खाद्यसंस्कृतीला महत्त्व

खाद्यसंस्कृतीबद्दल लोकांमध्ये चर्चा व्हावी, अनेक सकारात्मक संदेश सोशल मीडियावर असलेल्या लोकांपर्यंत पोचावेत हा ग्रुप सुरू करण्यामागचा उद्देश होता. मी ग्रुप सुरू केल्यानंतर काही लोकांना ॲडमिन केलं, त्यानंतर त्यांनीही उत्तम पद्धतीनं काम सुरू केलं. आमची अट फक्त ही होती, की या ग्रुपवर चर्चा फक्त खाद्यपदार्थांबद्दल आणि खाद्यसंस्कृतीबद्दलच होईल. यातूनच विस्मृतीत गेलेले पदार्थ किंवा महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीबद्दल- ज्यात विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांबद्दल चर्चा नेहमी होत असते. विविध पारंपरिक रेसिपी शेअर होत असतात आणि यामुळे स्वयंपाकातला रस वाढलेला दिसून येतो. आम्ही स्त्रीपुरुष समानता मानतो. आमच्या ग्रुपमध्ये महिला मोठ्या संख्येनं आहेतच; पण स्वयंपाक, खाद्यसंस्कृतीमध्ये रस असणारे पुरुषदेखील आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे, की या क्षेत्रात महिलांना जास्त काम करावं लागत आहे. कारण आपल्याकडे ती समानता अजूनही आलेली नाही

- भक्ती चपळगावकर

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com