माझ्या आयुष्याचा आत्मा

अभिनेत्री सोनल पवार यांनी त्यांच्या आई सविता यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना म्हणजे निस्सीम प्रेम, प्रेरणा आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या मायेचा सुंदर आरसा आहे.
My Mother My Strength
My Mother My Strength Sakal
Updated on

सोनल पवार - अभिनेत्री

माझ्यासाठी आई म्हणजे बिनशर्त प्रेम, आधाराची भक्कम भिंत, आणि न थकणारा, न संपणारा प्रेरणेचा स्रोत. माझी आई सविता ही केवळ माझी जन्मदात्री नाही, तर ती माझ्या आयुष्याचा आत्मा आहे. ती माझ्या प्रत्येक आनंदात, दुःखात, यशात, अपयशात अगदी पावलोपावली सोबत उभी राहणारी माझी सखी आहे. आईचं प्रेम हे असंच असतं. कुठल्याही अटीशिवाय, शुद्ध आणि नितळ. तिच्या कुशीत मिळणारी ऊब, तिच्या हातानं दिलेला गरम दुधाचा कप आणि तिच्या हातावरची मायेची थाप हे सारे अनुभव आजही मला सावरण्याचं बळ देतात. माझ्या बालपणात ती फक्त आई नव्हती, तर माझ्यासाठी ती खेळणारी सखी, अभ्यास घेणारी शिक्षिका आणि चुकल्यावर समजावणारी गुरू होती. ती नेहमी म्हणायची, ‘‘तू जे काही ठरवशील, ते तू करू शकतेस. फक्त स्वतःवर विश्वास ठेव.’’ तिचं हे वाक्य मी मनात कोरून ठेवलं आहे. अनेकदा मी आयुष्यात गोंधळले, भीतीने गाठले; पण तिचे शब्द आणि तिचा हात माझ्या पाठीवर होता. तिच्या त्या प्रेमळ स्पर्शानं आणि बोलण्यानं मला पुन्हा उभं राहायला मदत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com