Home Tips : भिंतीवरील जाळ्यांनी वैतागलात? 'या' ट्रिक्स वापरा, लगेच मिळेल सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Tips

Home Tips : भिंतीवरील जाळ्यांनी वैतागलात? 'या' ट्रिक्स वापरा, लगेच मिळेल सुटका

लोक आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. फरशी रोज झाडली, पूसली जाते. पण सीलिंग, छताची रोज सफाई करता येत नाही. त्यामुळे कोळी भिंती आणि छताला आपले घर बनवून घेते. पांढऱ्या रंगाची ही जाळी घरात घाण दिसतात. वास्तूनुसार त्याला अशुभ मानले जाते. जर तुमच्या घरातही अशी जाळी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

हेही वाचा: Home Tips : घरातले सोफे घाण झालेत? 'या' टिप्सने चमकवा

पांढरे व्हिनेगर

बहुतेक घरांमध्ये पांढऱ्या व्हिनेगरचा किचनमध्ये वापर होतो. या पांढऱ्या व्हिनेगरने तुम्हला या जाळ्यांपासून सुटका मिळू शकते. यासाठी व्हिनेगर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या. नंतर जाळ्यांवर हा स्प्रे मारा. व्हिनेगरच्या उग्र वासाने कोळी तिथे जाळं बनवणार नाही.

हेही वाचा: Home Tips : घर सजवण्याचा हिरवागार पर्याय

लिंबू आणि संत्र्याचे साल

लिंबू आणि संत्र्याचे साल यातून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. त्यापासूनही कोळी दूर पळतात. म्हणून जिथे जाळी धरली जातात तिथे त्याचे साल ठेवता येऊ शकतात. त्याच्या वासाने कोळी तिथे येणार नाही.

हेही वाचा: Dream Home: घर घेण्याचा विचार करताय? बजेट कसं करावं? जाणून घ्या

निलगिरी तेल

निलगिरी तेल बाजारात सहज उपल्बध्द असते. एका स्प्रे बॉटलमध्ये निलगिरी तेल भरून जाळ्यांवर स्प्रे करावे. यामुळे कोळी तिथून पळून जाईल.

पुदिना

पुदिन्याचाही वास तीव्र असल्याने जाळ्यावर याचाही उपाय होतो. पुदिन्याची पाने बॉटलमध्ये भरून स्प्रे करावे. पाण्याऐवजी पुदिन्याचे ऑईलही भरून स्प्रे करता येते.

Web Title: Spider Web Or Cobwebs On Wall Use These Tricks To Get Instant Relief

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tips