Helmet Cleaning Tips : हेल्मेट अस्वच्छ ठेवणं ठरु शकतं धोक्याचं! आजच करा आतून साफ...

केसातल्या धूळ आणि घामामुळे हेल्मेटमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात
Helmet Cleaning Tips
Helmet Cleaning Tipsesakal

Helmet Cleaning Tips : जर तुमच्याकडे स्कूटी किंवा बाईक असेल तर हेल्मेट देखील गरजेचे आहे. चुकून कोणता अॅक्सिडेंट झाला काही झालं तर अशा वेळेस हेल्मेट असेल तर कोणतीच दुखापत होणार नाही. अॅक्सिडेंटमुळे डोक्याला जीवघेणा इजा होण्याचा धोका कमी करण्यासाठी हेल्मेट तयार करण्यात आले आहे आणि हेल्मेट न घातल्यास दंडाची तरतूद आहे अशात लोक इच्छा नसतानाही हेल्मेट घालतात. पण हे हेल्मेट तुमच्यासाठी समस्या बनते जेव्हा तुम्ही त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही.

केसातल्या धूळ आणि घामामुळे हेल्मेटमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात. एकापेक्षा जास्त जणांनी हेल्मेट घातले तर हा त्रास वाढून गंभीर बनेल. त्यामुळे हेल्मेट नियमित स्वच्छ करावे. हेल्मेट देखील धुता येते हे अनेकांना माहीत नसेल. त्यामुळे ते घाणेरडे हेल्मेट डोक्यावर घालून बराच वेळ दुचाकी चालवत असतात. अशा परिस्थितीत हेल्मेटची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठीच्या या टिप्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतात.

Helmet Cleaning Tips
#Helmet  हेल्मेटसक्ती लांबणीवर

हेल्मेट स्वच्छ केले नाही तर काय होईल?

दररोज वापरल्या जाणाऱ्या हेल्मेटमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू असतात. त्यामुळे ते स्वच्छ न करता वापरल्याने डोक्याला आणि त्वचेला खाज येण्यासोबत केस खराब होण्याचा धोका असतो.

Helmet Cleaning Tips
नो हेल्मेट- नो पेट्रोल नंतर आता No Helmet- No Co-operation

व्हिझर स्वच्छ ठेवा

हेल्मेटमध्ये बसवलेले व्हिझर डोळे आणि चेहऱ्याचे धूळ, किडे आणि रस्त्यावरील कचऱ्यापासून संरक्षण करते. अशात, जर त्यावर खूप ओरखडे असतील तर ते पाहण्यात त्रास होऊ शकतो. म्हणूनच तुमच्या हेल्मेटचा व्हिझर वेळोवेळी बदलणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या कोणत्याही बाइक अॅक्सेसरीजच्या दुकानात जाऊन तुम्ही ते बदलून घेऊ शकता. कोमट पाणी आणि साबणाच्या मदतीने तुम्ही ते हाताने स्वच्छ करु शकता.

Helmet Cleaning Tips
Helmet Special Drive : दुचाकीस्वारांनो, हेल्मेट वापरा; आजपासून शहरात हेल्मेटसक्ती!

आतील पॅडची खोल साफसफाई करणे आवश्यक आहे

तुम्ही कोणते हेअर प्रॉडक्ट वापरत असाल तर त्यात घाम आणि धूळ मिसळते आणि कालांतराने दुर्गंधी निर्माण करते. त्यामुळे हेल्मेटही अस्वच्छ होते. अशात हेल्मेटची खोल साफसफाई करणे आवश्यक आहे. अनेक हेल्मेटच्या आतlले पॅड हे काढण्याजोगे पॅड असतात, तर काही हेल्मेटमध्ये ही सुविधा नसते. हे कसे काढायचे यासाठी तुम्ही youtube ची मदत घेऊ शकतात.

Helmet Cleaning Tips
Nashik Helmet Drive : वाहनचालकांची कारवाईच्या भीतीने पळापळ; 3 दिवसात 7 लाखांचा दंड वसुल!

जर ते काढता येऊ शकत असतील तर ते साफ करणे खूप सोपे आहे. फक्त तुमच्या हेल्मेटमधून पॅड आणि अस्तर घ्या आणि त्यांना बेबी शॅम्पू सोल्युशनमध्ये सुमारे ३० मिनिटे भिजवा. ते पाण्याने स्वच्छ करा आणि साधारणपणे उन्हात वाळू द्या.

Helmet Cleaning Tips
Gorakhpur Smart Helmet : बीटेकच्या मुलींचं नवं 'स्मार्ट' संशोधन

जर आतील अस्तर आणि पॅड काढता येत नसतील, तर संपूर्ण हेल्मेट बेबी शॅम्पूने बनवलेल्या मोठ्या बादलीत बुडवा. हेल्मेट कमीतकमी १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर आपल्या हातांनी हळूवारपणे घाण घासून टाका. ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवा आणि साधारणपणे उन्हात वाळवू द्या.

Helmet Cleaning Tips
Special Helmet: दारू पिल्यास चालू होणार नाही तुमची गाडी, विद्यार्थ्यांनी बनवले खास हेल्मेट; पाहा वैशिष्ट्ये

बफिंग आणि पॉलिशिंग

मोटारसायकल हेल्मेटची शाईन टिकवून ठेवण्यासाठी, तुम्ही हेल्मेटचे बाहेरील कवच बेबी शॅम्पूच्या पाण्याने आणि धूळ आणि काळेपणा काढण्यासाठी मऊ स्पंज किंवा सूती कापडाच्या तुकड्याने धुवू शकता. हेल्मेट साफ केल्यानंतर कोरडे झाल्यानंतर, ते परत नव्यासारखे दिसण्यासाठी पॉलिश करा.

Helmet Cleaning Tips
Sikh Helmet : शीख महिलेने मुलांसाठी स्वत:च डिझाईन केलं स्पेशल 'शीख हेल्मेट', Video Viral

हेल्मेट किती वेळा स्वच्छ करावे?

हेल्मेट रोज वापरले जाते. अशा परिस्थितीत, त्याची नियमित स्वच्छता देखील आवश्यक आहे. हेल्मेट महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी धुतले पाहिजे. तुम्ही डिओडोरायझिंग स्प्रे देखील खरेदी करु शकता जे तुम्ही तुमच्या हेल्मेटचा वास ताजे ठेवण्यासाठी वापरु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com