Street Dogs : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना, ही समस्या तर दुर्लक्षित करत नाही ना l Street Dogs Feeding harm to human bad habbit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Street Dogs

Street Dogs : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताना, ही समस्या तर दुर्लक्षित करत नाही ना?

Street Dogs Feeding : रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांना भूतदया म्हणून लोक येता जाता किंवा अगदी ठरावीक वेळांना पोळ्या, बिस्कीटं खायला घालतात. मग कोणी काही खायला आणलं म्हणून कुत्रे त्यांच्या दिशेने धावत येतात. काही लोक गाडीवरून जाता जाता कुत्र्यांना खाणं घालतात आणि कुत्रे त्यांच्या मागे धावतात. अशा परिस्थितीत आपण फार मोठी भूतदया करत असल्याचा आविर्भाव जरी या खाऊ घालणाऱ्यांचा असला तरी, यातून आपण त्या प्राण्यांच्या सवयी बिघडवत आहोत अशी साधी शंकाही कोणाला येत नाही.

नुकतीच एका लहान मुलाला भटक्या कुत्र्यांनी फाडून मारल्याची घटना घडली आहे. पण यापूर्वीही कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची, जीव गमवल्याच्या अनेक घटना घडल्याच्या आपल्याला माहित असतीलच. त्यामुळे आपण ज्याला भूतदया म्हणतोय ती खरचं भूतदया आहे का? याचा विचार करणं आवश्यक आहे.

जनावरं त्यांच्या सेल्फ इंस्टिंक्टनेच वागतात. त्यामुळे कोणाच्या हातात पिशवी दिसली किंवा कोणी त्या रस्त्याने गेलं की, त्याच्या मागे लागायचं हे घडणं स्वाभाविक असू शकतं. पण यामुळे माणसांच्या जीवाला धोका निर्माण होतो हे ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळे तात्पुरतं खायला घालून कोणतीही भूतदया होत नाही. उलट जर खरच कणव असेल तर त्यांचं पूर्ण पालन पोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, पण आयते खाण्याची सवय लावू नये.

टॅग्स :Stray Dogs