
थोडक्यात:
वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि नियंत्रित आहारासोबत व्यायाम आवश्यक आहे.
शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाऊ नये आणि उष्मांक वाढवणारे अन्न टाळावे.
डाएटिंग करताना शरीराची उपासमार न करता योग्य पोषण मिळणे गरजेचे आहे.
Crazy Diet Fads: स्थूलता झडावी आणि एकदम सडपातळ दिसावे, अशी इच्छा असणे गैर नाही. पण त्यासाठी शरीराची उपासमार करणारे डाएटिंग वाईट. आहार संतुलित व नियंत्रित असेल आणि जोडीला व्यायाम असेल तरच लठ्ठपणा कमी होतो. शरीराच्या तंदुरूस्तीकडे दुर्लक्ष करता नये.
वजन कमी करण्यासाठी आहार नियंत्रण हवे हे खरेच आहे. आहार नियंत्रण याचा अर्थ सरळ आहे. पहिली गोष्टी म्हणजे, शरीराच्या गरजेहून अधिक आहार घेऊ नये. दुसरी गोष्ट, उष्मांक वाढतील असेही अन्न सेवन करू नये. मात्र त्याचवेळी एक काळजी घ्यायची असते, ती म्हणजे शरीराची उपासमार करता कामा नये आणि आहार संतुलित असावा.