लिव्हिंग रूम म्हणजे दिवाणखाना हे घराचे हृदय असते, जिथे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवला जातो. ही खोली नेटकी, सुंदर आणि व्यवस्थित हवी. त्यासाठीच्या काही टिप्स बघूया..रंगसंगतीची योग्य निवडलिव्हिंग रूमला तुलनेने फिकट आणि उत्साहवर्धक रंग (जसे की क्रीम, पांढरा, पिवळा, पॅस्टल टोन) देणे जागेला मोठी आणि प्रकाशमय दिसण्यास मदत करते.फर्निचर आणि पडद्यांचे रंग भिंतीच्या रंगांशी जुळणारे असावेत. .फर्निचरची योग्य मांडणीसोफा आणि खुर्च्या अशा प्रकारे ठेवा, की संभाषणासाठी कोणालाही सारखेसारखे वळावे लागू नये.जागेच्या मध्यभागी कॉफी टेबल, किंवा सेंटर टेबल ठेवा आणि सोफ्यापासून ते योग्य अंतरावर ठेवा.या खोलीत फर्निचरची जास्त गर्दी करू नका. ‘लेस इज मोअर’ हे तत्त्व पाळा. .प्रकाशयोजनानैसर्गिक प्रकाशावर भर द्या. जास्तीत जास्त खिडक्या उघड्या ठेवा आणि हलके पडदे वापरा.लेअर्ड लायटिंगसाठी ॲम्बिएंट (छतावरील लाइट्स), टास्क (रिडिंग लॅम्प्स), अॅक्सेंट लाइटिंग (वॉल लाइट्स, एलईडी स्ट्रिप्स) यांचे मिश्रण करा.सेंटर पीस म्हणून स्टेटमेंट लाइट (जसे की चांदीचा झुमका किंवा मॉडर्न पेंडंट लाइट) वापरा. .भिंतींवर डेकोरेशनफोटो फ्रेम्स, वॉल आर्ट, आरसे किंवा वॉल शेल्फ्स यांचा नेमका आणि कल्पक वापर करा.कुटुंबातील सदस्यांचे फोटो ग्रुपने लावणार असाल, तर विशिष्ट पॅटर्न आणि संतुलन वापरा.वनस्पतींचा वापरस्नेक प्लांट, मनी प्लांट, किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स ठेवून निसर्गाचा स्पर्श द्या.हँगिंग प्लांटर्स किंवा वॉल-माउंटेड प्लांटर्स वापरून जागा वाचवा. .वैयक्तिक सर्जनशीलताफॅमिली फोटो, प्रवासात मिळणारे सुवेनिअर्स किंवा तुम्ही तयार केलेल्या कलाकृती, चित्रे यांचा वापर करून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटेल असे बघा.बुकशेल्फमध्ये आवडती पुस्तके, कॅंडल्स आणि तुमची सर्जनशीलता दाखवणारे डेको आयटेम्स ठेवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.