Gym Tips : स्टायलिश लूक आणि व्यायामासाठीही कम्फर्टेबल; जिमसाठी हे कपडे आहेत उत्तम

जास्त घट्ट कपडे घातल्यास व्यायाम करताना अस्वस्थ वाटू शकते. तसेच घट्ट कपड्यांमुळे रक्तप्रवाहात अडचणी येतात.
Gym
Gymgoogle

मुंबई : जिमला जायचं म्हणजे नेमके कसे कपडे घालावेत, या प्रश्नावरून अनेकांचा गोंधळ उडतो. योगासने करताना किंवा जिममध्ये व्यायाम करताना कम्फर्टेबल कपडे घालणे आवश्यक आहे. कपडे अडचणीचे असल्यास व्यायामात लक्ष लागत नाही.

जास्त घट्ट कपडे घातल्यास व्यायाम करताना अस्वस्थ वाटू शकते. तसेच घट्ट कपड्यांमुळे रक्तप्रवाहात अडचणी येतात. सैल कपडे योगासने करताना वर-खाली होतात. त्यामुळे व्यायाम नीट होत नाही. (stylish and comfortable clothes for gym which type of clothes I should put on for gym) हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Gym
Healthy Periods : पाळी तर येते; पण ती निरोगी पाळी आहे की नाही, हे कसं ओळखाल ?

जॉगर्स पॅण्ट

जॉगर्स पॅण्टमध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या डिझाइन्स सहज मिळतील. जॉगर पॅण्‍ट खूप सैल असतात आणि ती परिधान करून तुम्ही पायांचे व्यायाम सहज करू शकता. असे जॉगर्स तुम्हाला ५०० ते १००० रुपयांना सहज मिळतील.

डबल टी-शर्ट

डबल टी-शर्ट लूक तुमच्या शरीराला साथ देईलच पण तुम्हाला स्टायलिश लुक दाखवण्यास मदत करेल. डबल टी-शर्ट अनेक प्रकारे कस्टमाइजदेखील करू शकता.

तुम्ही फुल स्लीव्हज बॉडी फिट टी-शर्टवर मोठ्या आकाराचा टी-शर्ट घालू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या स्लीव्हलेस टी-शर्टपेक्षा कमीत कमी २ आणि ३ प्रकारचे टी-शर्ट यात वापरू शकता.

Gym
Gymgoogle
Gym
Alia Bhattचं घर आतून कसं दिसतं ? सासर नव्हे स्वर्गच जणू

स्ट्रेच पॅण्ट

जर तुम्हाला बॉडीफिट कपडे घालायला आवडत असतील तर तुम्ही स्ट्रेची पॅन्ट घालू शकता. तुम्हाला अशा स्ट्रेच पॅण्ट्स अनेक ब्रँडमध्ये सहज मिळतील. तुम्हाला अशा प्रकारच्या पॅन्ट्स साधारण १००० ते १५०० रुपयांना सहज मिळतील.

मोठ्या आकाराचे टी-शर्ट

हा ओव्हरसाईज टी-शर्ट परिधान करताना तुम्हाला आरामदायक वाटेल. कारण ते परिधान केल्याने तुम्ही तुमचे हात सहज हलवू शकाल, ज्यामुळे तुम्हाला व्यायाम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

तुम्हाला साधारण २०० ते ५०० रुपयांपर्यंत या प्रकारचा ओव्हरसाईज टी-शर्ट सहज मिळेल.

Gym
Gymgoogle

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com