Healthy Periods : पाळी तर येते; पण ती निरोगी पाळी आहे की नाही, हे कसं ओळखाल ?

पिरियडशी संबंधित अनेक प्रकारचे मिथक आजही आपल्या समाजात पसरलेले आहेत. यामुळेच मासिक पाळीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
periods
periodsgoogle

मुंबई : प्रत्येक महिन्याला वेळेवर मासिक पाळी येणे कोणत्याही महिलेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. पिरियडशी संबंधित अनेक प्रकारचे मिथक आजही आपल्या समाजात पसरलेले आहेत. यामुळेच मासिक पाळीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

तुम्हाला माहीत आहे का तुमची मासिक पाळी किती दिवसांची असावी, पीरियडच्या दिवसात रक्ताचा रंग काय असायला हवा, तुम्हाला पीरियडच्या दिवसात रक्ताच्या गुठळ्या होतात का, तुम्हाला मासिक पाळीत वेदना होतात की नाही, हे सर्व तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे. (how to know that my periods are normal or not symptoms of healthy periods ) हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

periods
Vaginal Health : योनिचे आरोग्य चांगले राखण्यासाठी PH कसा संतुलित कराल ?

पाळीचे चक्र किती दिवसांचे असावे ?

कालावधी २६ ते ३५ दिवसांच्या दरम्यान असला पाहिजे. जर तुमची मासिक पाळी ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त उशीर झाली असेल किंवा तुम्हाला २६ दिवसांच्या अंतरापूर्वी पुन्हा मासिक पाळी आली तर ते तुमच्या हार्मोन्समध्ये गडबड झाल्याचे लक्षण आहे.

या कालावधीत प्रवाह सुमारे ६ दिवस टिकला पाहिजे. जर मासिक पाळी यापेक्षा जास्त काळ टिकली तर ते चांगले नाही.

पाळीच्या वेदना

मुलींना हे नेहमी समजावून सांगितले जाते की मासिक पाळी दरम्यान वेदना सामान्य आहे आणि ते सहन केले पाहिजे. पण खरं तर मासिक पाळीपूर्वी किंवा मासिक पाळी सुरू असताना पाय, पाठ किंवा पोटात दुखत असेल तर ते सामान्य नाही.

हलक्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते, परंतु जास्त वेदना झाल्यास, ते सहन करण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घ्या.

periods
Pregnancy Dreams : गरोदरपणाची स्वप्नं पडतायत ? ही असू शकतात कारणं

मासिक पाळीत रक्ताच्या गुठळ्या

जर तुम्हाला पीरियड फ्लोमध्ये जड रक्ताच्या गुठळ्या होत असतील ज्याचा रंग गडद लाल आहे, तर पाळीमध्ये काही समस्या असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

पीएमएस सामान्य आहे की नाही

मासिक पाळीच्या आधी तुम्हाला पीएमएस म्हणजेच प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणे जाणवत नसतील तर ते एक चांगले लक्षण आहे. बर्‍याच स्त्रियांना मासिक पाळीच्या १-२ आठवड्यांपूर्वी मूड स्विंग, चिडचिड, डोकेदुखी यांसारख्या समस्या सुरू होतात. हे हार्मोन्समधील बदलामुळे होते. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत नसतील तर हे निरोगी पीरियड्सचे लक्षण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com