Success Story : 1500 रूपये अन् मेहनतीच्या Investment वर ही महिला बनली कोट्यावधींची मालकीण!

सायकलवरून प्रवास करत दारोदारी विकले बॉक्स
Success Story
Success Storyesakal

Success Story :  नवा काही व्यवसाय करायचा म्हटलं की त्यात सुरूवातीपासून एकाच गोष्टीवर जास्त विचार अन् चर्चा केली जाते. ती म्हणजे, व्यवसायाचं भांडवल कसं उभं करावं ही होय. व्यवसाय उभा करताना केवळ पैसा जमवला की यश मिळतं असं नाही होत. त्यासाठी मेहनत,चिकाटी, प्रबळ इच्छाशक्तीचीही गरज असते.

अनेक भारतीय महिला व्यावसायिक जगतात खूप प्रसिद्ध आहेत. जगभरात त्या मोठ्या कंपन्यांच्या मालक आणि सीईओ म्हणून काम करत आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यातील एका साध्या महिलेने स्वत:च्या बळावर करोडोंची कंपनी स्थापन केली आहे. (Sangeeta Pandey From Gorakhpur Started Business 1500 Rs Became Millionaire Know Success Story)

Success Story
PSI Success Story : `कमवा व शिका` योजनेततून 'अमृता' शिकली अन् घातली खाकी वर्दीला गवसणी !

ही महिला कोणत्याही मोठ्या उद्योगपती घराण्याशी संबंधित नाही किंवा तिला सुरुवातीच्या काळात व्यवसायाचे फारसे ज्ञान नव्हते. थोड्या पैशातून व्यवसाय सुरू केला आणि स्वतःच्या बळावर करोडोंच्या कंपनीची मालक बनली.

या यशापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आले, पण गोरखपूरच्या महिलेने त्या सर्वांचा  सामना केला. पण या महिलेने त्या सर्वांचा धडाडीने सामना केला. गोरखपूर जिल्ह्यातील महिला व्यावसायिक संगीता पांडे यांच्याबद्दल जाणून घेऊया. (Success Story)

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात राहणाऱ्या संगीता पांडे या अडीच कोटी रुपयांच्या कंपनीच्या मालक आहेत. त्यांची कंपनी सध्या लाखोंची उलाढाल करत आहे. त्यांच्या यशासाठी आणि उत्कटतेसाठी सरकारने त्यांचा ‘गोरखपूर रत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

Success Story
Success Story : सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न झाले पूर्ण; डॉक्टर होणार ‘फ्लाइंग ऑफिसर’

कमी संसाधनांमध्ये छोटासा व्यवसाय सुरू करून त्याला उंचीवर नेण्याचे धाडस दाखविणाऱ्या संगीता महिलांसाठीच नव्हे तर व्यावसायिक पुरुषांसाठीही प्रेरणादायी ठरल्या आहेत. संगीता पांडे गोरखपूरच्या झर्नाटोला येथील रहिवासी आहेत. संगीता लष्करी कुटुंबातील आहे. त्याचे वडील आणि भाऊ सैन्यात आहेत.(Business Tips)

संगीता पांडे यांचे शिक्षण

संगीताने तिचे सुरुवातीचे शिक्षण केंद्रीय विद्यालयातून केले आणि नंतर गोरखपूर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. शिक्षणानंतर त्यांचे लग्न झाले पण त्यांची महत्वाकांक्षा कधीच कमी झाली नाही.

Success Story
Sucess Story : फक्त दहा मिनिट पाणी देऊन, दोनच महिन्यात पिकवली सात किलो वजनाची कंलिगड

फॅन्सी पॅकेजिंग बॉक्स कारखाना

साध्या गृहिणीसारखं आयुष्य जगणाऱ्या संगीता यांनी काहीतरी करायचं ठरवलं आणि मिठाईच्या पॅकेजिंगसाठी फॅन्सी बॉक्स डिझाइन करण्याची योजना आखली. जिल्ह्यातील पदरी बाजार येथील शिवपूर साहबाजगंज येथे मिठाईच्या दुकानांसाठी फॅन्सी पॅकिंग कॅन बनविण्याचा कारखाना सुरू केला. (Women Success Story)

अवघ्या 1500 रुपयांपासून व्यवसाय सुरू केला. ऑर्डर देण्यासाठी संगीता गोलघरमधील एका नामांकित दुकानात पोहोचल्या. तेव्हा त्यांच्याकडे एक सायकल होती. त्यानेच त्या प्रवास करायच्या. दुकानात जाऊन उत्पादनाबद्दल माहिती देत त्या ऑर्डर घ्यायच्या.

Success Story
FIFA Womens World Cup: न्यूझीलंडमध्ये मॅच सुरू होण्यापूर्वी नॉर्वे टीमच्या हॉटेलजवळ गोळीबार, दोन ठार

एका दुकानातून पहिली ऑर्डर मिळाल्यावर संगीताने 20 बॉक्स तयार केले. दुकानदाराला हे बॉक्स आवडले, त्यानंतर त्यांना आणखी ऑर्डर मिळू लागल्या. हाच व्यवसाय पुढे त्यांनी आणखी मोठा केला. (Women)

आज संगीता सुमारे 150 महिलांना रोजगार देत आहे. त्यांची कंपनी करोडोंची कमाई करते. जे लोक तिच्या कामावर टोमणे मारत होते आणि तिला साथ देत नव्हते, त्या सर्वांनाच यशाची एक चपराकच मारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com