
डिसेंबरअखेर ही कलिंगडे बाजारपेठेत आणली.
Sucess Story : फक्त दहा मिनिट पाणी देऊन, दोनच महिन्यात पिकवली सात किलो वजनाची कंलिगड
गावतळे (रत्नागिरी) : रासायनिक शेतीमुळे उत्पन्न वाढले, पण त्यामुळे जमीन नापिक होते. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम जग भोगत आहे. त्यामुळेच काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. जालगाव (दापोली) येथील सतत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेतलेले शेतकरी रमाकांत शिगवण यांनी दोन गुंठ्यांत सेंद्रिय खते वापरून कलिंगडाची यशस्वी शेती केली. डिसेंबरअखेर ही कलिंगडे बाजारपेठेत आणली.
प्राथमिक शिक्षक पदापासून शिक्षण विस्ताराधिकारी पदापर्यंत उत्कृष्ट कार्य करणारे, दीर्घकाल ज्ञानदानाची सेवा करून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले शिक्षक रमाकांत शिगवण हे उदयोन्मुख शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी शेतकरी आहेत. सेंद्रिय खतांवर तयार झालेली कलिंगडाची चवही गोड, त्यामुळे भावही चांगला मिळाला आणि लोकांना सेंद्रिय फळ दिलं यांचं समाधान शिगवण यांना आहे. मातीत माती मिसळली की, मोती पिकवता येतात, हेच रमाकांत शिगवण यांनी दाखवून दिले. यापूर्वीही त्यांनी काजू, केळी, रताळी, भोपळे आदी पिके भरघोस प्रमाणात घेतली तीही विषमुक्त.
हेही वाचा - संयुक्त महाराष्ट्रासाठी छातीवर झेलल्या गोळ्या -
शेती पाहून आनंद व्यक्त
रमाकांत शिगवण यांच्या या शेतीतील वेगळ्या प्रयोगाची माहिती मिळताच बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश देवघरात यांनी शिगवण यांनी पिकवलेली कलिंगडची शेती पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शिगवण गुरुजींचा आदर्श घेऊन कृषी क्षेत्रात यशस्वी कामगिरी करावी. रासायनिक शेतीने आपण अनेक रोग निर्माण केले म्हणून विषमुक्त शेतीची आणि शिगवण गुरुजींसारख्या शेतकऱ्यांची आज गरज आहे.
उंच माळरानावर लागवड
जालगाव आणि वळणेदरम्यान उंच माळरानावर दोन गुंठे जागेत शिगवण यांनी अगस्ता वाणाच्या कलिंगडची ऑक्टोबर २० मध्ये लागवड केली. यासाठी गाईचं शेण, लेंडी, कोंबडीची विष्ठा आदींचा वापर करून रोज फक्त दहा मिनिटे पाणी देऊन डिसेंबरअखेर त्यांनी सुमारे २८० कलिंगडे बाजारात आणली. तीही सात-सात किलो वजनाची.
हेही वाचा - फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठविली अन् -
संपादन - स्नेहल कदम