Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Success Mantra: तुमच्या काही खराब सवयींमुळे करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात.
Success Mantra:
Success Mantra:Sakal

अनेक लोक आयुष्यात यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्यास यश पटकन मिळते. पण आपल्या अनेक सवयी यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे करिअर खराब होऊ शकते.

पुढील सवयींमुळे करिअर होऊ शकते खराब

ऑफिसला उशीरा जाणे

जर तुम्ही अनेकदा ऑफिसला उशीरा पोहोचलात तर तुमचे करिअर खराब व्हायला वेळ लागणार नाही. ही एक सवय आहे जी तुमच्या सहकाऱ्यांना आणि तुमच्या बॉसलाच निराश करत नाही तर तुमच्या कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम करते. उशिरा पोहोचल्यास तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाही.

आळशी असणे

जर तुम्ही कोणतेही काम करण्यात खूप आळशी असाल आणि तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुमची आयुष्यात प्रगती कधीच होणार नाही. कामाबाबत उत्साही नसल्यास तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कधीही प्रगती करू देणार नाही. तुमच्या कामात नेहमी सक्रिय राहा आणि तुमच्या वेळेचा सदुपयोग करायला शिका.

नकारात्मक विचार

नकारात्मक दृष्टीकोन असलेले लोक कोणत्याही कामाच्या ठिकाणी चांगले नसतात. जे लोक नेहमी नकारात्मक विचार आणि तक्रारींनी भरलेले असतात ते तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे मनोबल नेहमी कमी ठेवतात. त्यामुळे कामाचे वातावरण बिघडते.

Success Mantra:
Success Tips: एक एक मिनिट आहे महत्त्वाचा... वेळेचं 'असं' करा नियोजन; आयुष्यात मिळेल यश

नियमांचे पालन

कामाच्या ठिकाणी शिस्त खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही आणि तुमची जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजी राहिल्यास तुम्हाला नक्कीच अडचणींना सामोरे जावे लागेल. शिस्त न पाळणाऱ्यांचे करिअर अनेकदा उद्ध्वस्त होते.

प्लॅनिंग करावे

कोणत्याही योजनेशिवाय काम करणे म्हणजे वेळेचा मोठा अपव्यय आहे. ज्या लोकांना वेळ वाया घालवायची सवय असते, त्यांचे करिअर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. तसेच नियोजन करून काम केल्यास वेळेचा अपव्यय वाचतो. त्यासाठी आठवडा, महिना किंवा वर्षाचे नियोजन करून काम करण्याची सवय लावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com