esakal | उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फ्रिजी केसामुळे त्रस्त असाल तर Hair Hacks से होईल काम

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फ्रिजी  केसामुळे त्रस्त  असाल तर Hair Hacks से होईल काम

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फ्रिजी केसामुळे त्रस्त असाल तर Hair Hacks से होईल काम

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : ज्यांचे केस अत्यंत फ्रीजी असतात त्यांना प्रत्येक ऋतूमध्ये केसांची समस्या जाणवते. उन्हाळा असो वा हिवाळा या ऋतूमध्ये त्यांना समस्या भेडसावत असते. अशावेळी अनेक जण यासाठी अत्यंत महागडे प्रॉडक्ट वापरतात किंवा स्टेटनर अथवा ब्लो ड्रायर चा वापर करून केसांना सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही पद्धत केसांची अधिकच समस्या निर्माण करू शकते. केसांची समस्या कमी करायचे असेल तर हीट प्रोडक्ट चा उपयोग करू नका. या उत्पादनांचा वापर केला तर ते केस अधिक डॅमेज होतील. उन्हाळ्यामध्ये आपल्या फिजी केसाना असलेल्या समस्या थांबवण्यासाठी या टिप्स चा वापर करू शकता...

टॉवेल ऐवजी कॉटन टी-शर्ट ने केस कोरडे करा

ज्यांचे केस फ्रिजी असतात त्यांनी केस कोरडे करतांना जास्त जाड कापडाने खूप जोराने केस पुसू नका. जर तुमचे केस ओले असतील तर ते टी शर्ट च्या मदतीने पुसून घ्या. केस हलक्या हाताने सुट्टे करून घ्या असे केल्यामुळे ओल्या केसांना आधार मिळेल आणि तुमचे केस ज्यादा निर्जीव होण्यापासून वाचतील.

केसांना वापरा स्टेटनिंग हेअर मास्क

केस फ्रिजी होण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही हेअर मास्क वापरू शकता. यासाठी तुम्ही मधापासून बनवलेले मास्क वापरू शकता. यामुळे केस सरळ होतात आणि मऊपणा येतो.

आवश्यक साहित्य

एक पिकलेले केळ, दोन चमचा मध, एक चमचा बदाम तेल.

तुम्ही हे तिनी वस्तू चांगल्या पद्धतीने मिक्स करा आणि ते केसांना लावा. एक तासानंतर केस धुऊन घ्या तुमचे केस नैसर्गिक रित्या चांगले दिसतील.

कंडीशनर आणि तेलाचा वापर करा...

अनेक जण आपल्या केसांना तेल लावत नाहीत. वास्तविक फ्रिजी असलेल्या केसांना वाचवण्यासाठी काही घटकांची गरज असते. त्यामध्ये केसांना लावण्यासाठी असलेल्या तेलाचा अत्यंत उपयोग होतो.तुम्ही कंडीशनर वापरताना त्यामध्ये ग्रेपसीड किंवा जोजोबा ओईल थोडेसे घाला.हे मिश्रण एक ते दोन चमचा घ्या आणि त्या सोबत कंडिशनर चांगल्या पद्धतीने लावा केस धुतल्यानंतर तुम्हाला केसांच्या मध्ये चांगली सुधारणा दिसून येईल.

सुकलेल्या केसामध्ये सिरम लावा.

तसे पाहिले तर ओल्या केसांना हेअर सिरम लावतात. आणि त्यामुळे आपली केस स्ट्रेट होतात. परंतु केस जर जास्त ओले झाले असतील तर त्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. जर तुमचे केस फ्रीजी असतील तर केस सुकल्या नंतरच त्यावर सिरम लावा. यामुळे तुमच्या केसावर या सिरमचा उपयोग जास्त वेळ होईल आणि केसांचा फिजीनेस कमी होईल.

केस धुताना जास्त घासू नका

अनेक लोकांना केस धूत असताना जास्त केस घासण्याची सवय असते यामुळे आपले केस जास्तच फ्रिज़ी होतात. केसांना थोडीशी घासून त्यानंतर हलक्या हाताने शाम्पू करा यामुळे केस अधिक सुट्टे होतील आणि ज्यादा फ्रीजी होणार नाहीत.केसांसाठी या उपाययोजना अत्यंत उपयुक्त असे आहेत आणि ते सहजपणे तुम्ही करू शकता.