सुकामेवा खरेदीकडे ग्राहकांची पाठ, वाढत्या उष्णतेचा यंदा शहरातील व्यावसायिकांवर परिणाम

Dry Fruits: सुकामेवा खरेदीसाठी हिवाळ्यात, पावसाळ्यात मोठी गर्दी असते. परंतु उन्हाळ्यात ते खरेदी केले जात नाही असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Dry Fruits
Dry Fruits Sakal

Dry Fruits: निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा दररोज खावा, असे म्हटले जाते. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळा मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोहासह जीवनसत्वे, प्रथिने मिळतात. परंतु कडक उन्हामुळे यंदा सुकामेव्याच्या विक्री ५० टक्क्यांनी घटली आहे. त्याचा विक्रेत्यांना चांगलाच फटका बसत आहे.

निरोगी जीवनशैलीसाठी आपला आहार सकस आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. त्यासाठी व्यायामासोबतच वेगवेगळी फळे, पालेभाज्या, डाळी, अंडी आणि सुकामेवा यांसारखे घटक आपल्या रोजच्या आहारात असावेत, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. सकाळी उठल्यावर, भूक लागल्यावर फुटकळ पदार्थ खाणे टाळण्यासाठी बऱ्याचजणांना बदाम, बेदाणे यासारखा सुकामेवा खाण्याची सवय असते. असे केल्याने शरीराला आवश्यक असणारे

पोषक घटक मिळून तुमचे एकंदरीत आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते. असे असले तरीही उन्हाळ्यात सुकामेवा खाऊ नये, असेही काही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तसेच सुकामेव्यातील अनेक पदार्थ उष्ण असल्याने नागरिक देखील उन्हाळ्यात ते खाणे टाळतात. त्यातच यंदा तापमान सातत्याने चाळिशीच्या पुढे असल्याने नागरिकांनी सुकामेवा खरेदीकडे पाठ फिरविली आहे.

Dry Fruits
Fruits For Weight Loss : उन्हाळ्यात वजन कमी करायचय? मग, आहारात ‘या’ फळांचा करा समावेश, झपाट्याने वजन होईल कमी

असे आहे दर (प्रतिकिलो/रुपयांत)

पिस्ता २,४०० ते २,८००

काजू ७०० ते १,६००

अक्रोड १,४०० ते १,७००

बदाम ८०० ते १,२००

किशमिश ४०० ते ६००

पायनापल कॅण्डी ६००

मशरूम १,२००

सनफ्लॉवर सीड्स ६००

पमकिन सीड्स ६००

आलुबुखारा ८००

किवी ६००

पेंडखजूर १२० ते ६००

मगज १,४०० ते १,८००

सुकामेवा खरेदीसाठी हिवाळ्यात, पावसाळ्यात मोठी गर्दी असते. परंतु उन्हाळ्यात ते खरेदी केले जात नाही असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शहरात सुकामेव्याचे शंभर विक्रेते आहेत. चांगला दर्जाचा माल जरी असला तरी उष्णतेमुळे सुकामेवा खात नाही. माल कितीही चांगला असला तरी ग्राहक उन्हाळ्यात सुकामेवा खात नाहीत.

- अब्दुल हकीम खान, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com