Fruits For Weight Loss : उन्हाळ्यात वजन कमी करायचय? मग, आहारात ‘या’ फळांचा करा समावेश, झपाट्याने वजन होईल कमी

Fruits For Weight Loss : सध्याची बिघडलेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढलेले सेवन, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
Fruits For Weight Loss
Fruits For Weight Lossesakal

Fruits For Weight Loss : सध्याची बिघडलेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढलेले सेवन, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि विविध समस्या निर्माण होतात. मागील काही वर्षांपासून लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत.

मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम यांची मदत घेतली जाते. परंतु, एवढ सगळ करूनही लगेच फरक पडतो असे ही नाही. परंतु, प्रत्यक्षात वजन कमी करण्यासाठी महागडे डाएटिंग, उपवास इत्यादी गोष्टी करण्याची गरज नाही. तुम्ही आहारात हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून आणि नियमितपणे व्यायाम करून सहज वजन कमी करू शकता.

उन्हाळ्यात वजन कमी करणे सहज सोपे असते. या दिवसांमध्ये अशी अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात, ज्यामध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी असते. ही फळे वजन कमी करण्यासाठी अतिशय चांगली मानली जातात. या फळांचा आहारात समावेश केल्याने तुम्ही उन्हाळ्यात वजन सहज कमी करू शकाल. कोणती आहेत ही फळे? चला तर मग जाणून घेऊयात.

Fruits For Weight Loss
Fruits In Summer : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी खायलाच हवीत ‘ही’ फळे, आजारांपासून होईल बचाव

किवी

उन्हाळ्यात हमखास मिळणारे फळ म्हणजे किवी होय. किवीमध्ये खूप कमी प्रमाणात साखर असते. शिवाय, व्हिटॅमीन सीचे प्रमाण भरपूर असते. किवी हे फळ हृदय आणि पोटासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या फळाचे सेवन केल्याने शरीराची चयापचयाची क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

कलिंगड

उन्हाळ्यात ज्या फळाची आतुरतेने वाट पाहिली जाते आणि ज्याचा अधिक प्रमाणात आस्वाद घेतला जातो, ते फळ म्हणजे कलिंगड होय. कलिंगडाचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

या फळामध्ये ९०% पाणी आढळून येते. तसेच, या फळामध्ये कॅलरीचे आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय गुणकारी मानले जाते. कलिंगडाचे सेवन केल्याने लवकर पोट भरते आणि वजन सहज कमी होते.

संत्रा

संत्रामध्ये पोषकतत्वांचे मुबलक प्रमाण आढळून येते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले हे फळ उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. संत्र्याचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासही मदत होते. संत्र्यामध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते.

Fruits For Weight Loss
Detox Drink : रात्रभर पाण्यात भिजवलेले हे पदार्थ शरीर करतील डिटॉक्स, Weigh Loss साठी जालीम उपाय!

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com