esakal | शॅम्पू मध्ये फक्त एका गोष्टीचा करा वापर; केस होतील काळेभोर
sakal

बोलून बातमी शोधा

super shine hair for homemade tips for women in kolhapur

तसेच हा उपाय करण्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत. यामुळे केस सॉफ्ट तर होतातच शिवाय आकर्षणही दिसतात.

शॅम्पू मध्ये फक्त एका गोष्टीचा करा वापर; केस होतील काळेभोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तुम्हाला सुपर शायनी आणि काळेभोर लांबलचक केस हवे आहेत? परंतु केमिकलयुक्त उत्पादने तुम्ही वापरू शकत नाही हो ना! यावेळी नैसर्गिक उपाय समजून येत नसतील तर या कृत्रिम पद्धतींचा जरूर वापर करा. ही पद्धत तुमच्या केसांना इतकं सुंदर बनवेल नेहमीच तुमचे केस सिल्की आणि शायनी राहतील. इतरांनाही तुमच्यासारखे केस असावेत अशी इर्षा निर्माण होईल. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु या उपायांमुळे तुम्ही केसांमध्ये शक्ती निर्माण करू शकता. हा उपाय तुमच्या केसांसाठी करायचा असल्यास तुम्ही हे आर्टिकल जरूर वाचा. यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, जी बाजारामध्ये मिळणाऱ्या प्रोडक्ट्ससाठी जितका पैसा खर्च करावा लागतो त्याच्या तुलनेत कमी खर्चाची आहे. तसेच हा उपाय करण्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत. यामुळे केस सॉफ्ट तर होतातच शिवाय आकर्षणही दिसतात.

बनवण्याची पद्धत - 

लिंबाचे झाड घराजवळ आसपास तुम्हाला मिळून जाईल. हा उपाय बनवण्यासाठी लिंबाचा पाला तोडून फांदीपासून वेगळा करा. यासाठी तुम्हाला 100 ते 150 पानांची गरज लागेल. जर तुमचे केस लांब असतील तर जास्तीचा उपयोग तुम्ही करू शकता. या पानांना स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यावरची धूळ माती झटकून टाका. कारण चांगले रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला ही पाने स्वच्छ करून घ्यावी लागतील. यानंतर ही लिंबाची पाने कट करून घ्या. आणि मिक्सरमध्ये या पानांचा बारीक चुरा करून घ्या. आता हा चुरा स्वच्छ गाळणीने गाळून घ्या. यामुळे तुम्हाला लिंबाचा रस किंवा लिंबाचे पाणी मिळून जाईल. आता हे पाणी गॅसवर ठेवा आणि अर्ध्या मिनिटासाठी ते गरम करा. नंतर हे थंड होऊ द्या. एका बाउलमध्ये तुमच्या पसंतीचा कोणताही शॅम्पू घेऊन त्यामध्ये हे मिश्रण मिक्स करा. गरज वाटल्यास तुम्ही शॅंपूच्या बॉटलमध्येही हे मिक्स करू शकता.

वापरण्याची पद्धत -

या मिश्रणाला सर्क्युलर मोशनप्रमाने तुमच्या केसांना लावा. उत्तम प्रकारे लावल्यास याचे रिझल्टही उत्तम मिळतात. आणि केसही हेल्दी राहतील. केसांवरती काही वेळासाठी हे लावून साफ करा. आठवड्यातून एक दिवसआड तुम्ही याचा वापर करू शकता. अंघोळ करण्याआधी याचा वापरही तुम्ही करू शकता. यामुळे तुमचा केसातील कोंडाही दूर होण्यास मदत होईल तसेच केस शायनी होतील. 

loading image