swiggy | ....म्हणून हा मुलगा घोड्यावरून फूड डिलिव्हरीसाठी निघाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swiggy delievery boy

....म्हणून हा मुलगा घोड्यावरून फूड डिलिव्हरीसाठी निघाला

मुंबई : सध्या सोशल मीडियावर स्वीगीच्या एका डिलिव्हरी बॉयचा (swiggy delievery boy) व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचत असताना हा मुलगा घोड्यावरून फूड डिलिव्हरीसाठी फिरत आहे.

हा मुलगा फूड डिलिव्हरीसाठी घोड्यावरून जात असल्याचा हा व्हिडिओ अवघ्या सहा सेकंदांचा आहे. पण हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये स्वीगीची बॅग पाठीवर लावलेला मुलगा घोड्यावर बसलेला दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झालाय म्हणजे कमेंट्स तर येणारच. वापरकर्त्यांच्या कमेंट्सनी या व्हिडिओचा कमेंट्सनी भरला आहे.

हा डिलिव्हरी बॉय घोड्यावरून का निघाला हे सांगता येणार नाही. मात्र यावरून त्याची कामावरची निष्ठा दिसून येते. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, याला शाही डिलिव्हरी म्हणता येईल.

या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज जाहीर केला. काळबादेवी आणि शीव येथे इमारत कोसळ्याच्या दुर्घटनाही घडल्या.