Relationship Tips : जोडीदाराने आत्मविश्वास गमावलाय का ? ही आहेत गंभीर लक्षणे

नातेसंबंध आनंदी आणि निरोगी ठेवण्यासाठी असुरक्षितता वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या जोडीदारामध्ये आत्मविश्वास कमी आहे हे कसे ओळखाल ?
Relationship Tips
Relationship Tipsgoogle

मुंबई : वैवाहिक आयुष्य ही सर्वात सुंदर गोष्ट असली तरीही काही वेळा त्यात चढ-उतार येऊ शकतात. दोघांपैकी एखाद्यामध्ये आत्मविश्वास कमी असू शकतो. यामुळे नातेसंबंधामध्ये असुरक्षितता निर्माण होऊ शकते.

याची परिणती पुढे मत्सर, द्वेष आणि नकारात्मक भावनांमध्ये होते. नातेसंबंध आनंदी आणि निरोगी ठेवण्यासाठी असुरक्षितता वाढण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या जोडीदारामध्ये आत्मविश्वास कमी आहे हे कसे ओळखाल ? हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

Relationship Tips
Relationship tips : रोज या गोष्टी केल्यास अधिक घट्ट होईल वैवाहिक नाते

स्वतंत्र सामाजिक जीवनाचा अभाव

जेव्हा दोन व्यक्ती बराच वेळ एकत्र असतात तेव्हा विश्रांतीसाठी थोडा वेळ आणि एकांत आवश्यक असतो. जर तुमच्या लक्षात आले की तुमचा जोडीदार कायम तुम्हालाच चिकटलेला असतो आणि तुमच्याशिवाय इतर लोकांमध्ये जात नाही, तर ते असुरक्षित असल्याचे हे एक मोठे लक्षण आहे.

मत्सर

जेव्हा एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा स्वत:ला कमी समजायला लागतो तेव्हा नातेसंबंधात असुरक्षितता येते. अशा प्रकरणांमध्ये मत्सर ही एक सामान्य क्रिया आहे आणि आपल्या जोडीदाराला नातेसंबंधात सुरक्षित वाटत नसल्याचे हे एक प्रमुख सूचक आहे.

प्लेइंग द व्हिक्टिम कार्ड

युक्तिवाद किंवा फक्त संभाषण दरम्यान, तुमचा जोडीदार संपूर्ण दोष तुमच्यावर टाकतो आणि पीडितेची भूमिका बजावतो ज्याकडे लक्ष देण्याची गरज असते. हे एक नैसर्गिक वैशिष्ट्य किंवा मोठे होत असताना त्यांनी स्वीकारलेले व्यक्तिमत्त्व असू शकते. ही गोष्ट तुमच्या नात्यासाठी घातक आहे.

पर्सनल स्पेस नसणे

जर तुमचा जोडीदार तुम्हाला वैयक्तिक मोकळीक देत नसेल तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, त्यांना सतत तुमच्या आसपास राहायचे आहे आणि तुम्हाला गमावण्याची भीती वाटते.

Relationship Tips
Relationship tips : नातेसंबंधात असूनही एकटेपणा वाटतोय ? ही आहेत कारणे...

टीका सहन करू शकत नाही

असुरक्षित लोक टीका झाल्यावर मोठ्याने प्रतिक्रिया देतात. ही अर्थपूर्ण टिका किंवा तुम्ही शेअर करत असलेले मत असू शकते.

स्वकेंद्रीपणा

असुरक्षिततेची भावना मनात घेऊन जगणारी व्यक्ती स्वकेंद्री असते. सर्व काही आपल्या बाजूने व्हावे असे त्या व्यक्तीला वाटत असते.

गमावण्याची भीती

तुमचे तुमच्या जोडीदारावर असलेले प्रेम तुम्ही वेळोवेळी व्यक्त करत असतानाही जोडीदार पुन्हा-पुन्हा तुम्हाला त्याबद्दल विचारत राहातो. ही कंटाळवाणी स्थिती असते.

छोट्या छोट्या गोष्टींसाठी माफी मागणे

नातेसंबंधांमध्ये अनेकदा वाद आणि गैरसमज असतात परंतु विनाकारण सतत माफी मागणे त्रासदायक असू शकते.

सतत तुलना

जोडीदार सतत तुमच्याशी स्वत:ची तुलना करत राहातो. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने प्रगती करत असताना अशाप्रकारे तुलना करत राहाणे तापदायक असू शकते.

अतिविचार करणे

एकाच विषयावर सतत अतिविचार करणे आणि त्यांना कसे वाटते किंवा तुम्ही काय बोललात याविषयी गृहीतके बांधणे हेच एक असुरक्षित व्यक्ती करते.

अशा परिस्थितीत, आपल्या जोडीदाराला मदत करणे आणि त्याचा आत्मविश्वास परत मिळवणे अनेकदा कठीण होते. बहुतेकांसाठी ही असुरक्षितता वैयक्तिक कमतरतांमधून उद्भवते आणि चिंतनशीलता यावर मात करण्यास मदत करू शकते.

तुमच्या जोडीदारासोबत बसा आणि त्यांचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण करण्यात मदत करा. जसजसे ते स्वत:चे कौतुक करू लागतील आणि त्यांच्या स्वतःच्या परीघात आरामदायक असतील, तेव्हा नातेसंबंधही सुधारू लागतील. परिस्थिती आवाक्याबाहेर असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com