टैनिंग ने पाय काळे झाले आहेत! या घरगुती उपायाने काही मिनिटात पायाची त्वचा होईल उजळ

टैनिंग ने पाय काळे झाले आहेत!  या घरगुती उपायाने काही मिनिटात पायाची त्वचा होईल उजळ

कोल्हापूर : उन्हाळ्यामध्ये तुमचे पाय जर काळपट दिसत असतील तर ते पुन्हा एक वेळ गोरे करण्यासाठी तुम्ही ही घरातील सहज पद्धत अवलंबू शकता.उन्हाळ्यामध्ये आपण सॅंडल, चप्पल वापरतो. अशावेळी सूर्यकिरणातील अल्ट्रावायलेट किरण तसेच धूळ आणि दिवसभराचे प्रदूषण यामुळे पायाच्या त्वचेवर मृतपेशी मोठ्या प्रमाणात जमतात. त्याचबरोबर आपली स्किन ही टॅन होते. यामुळे आपले पाय काळे दिसू लागतात. आपण आपला चेहरा, मान, हाताची काळजी घेतो परंतु आपण पायाकडे दुर्लक्ष करतो. योग्य निगा न राखल्यामुळे आणि प्रदूषणाच्या माऱ्यामुळे पायाच्या त्वचेला मोठे नुकसान होते आणि त्यामुळेच आपले पाय काळे दिसू लागतात. अशावेळी तुम्ही सहजपणे घरगुती उपाय करू शकता त्यामुळे हा काळेपणा दूर होईल आणि तुमचा पाय पुन्हा एकदा उजळ दिसेल.

लिंबू आणि मध

लिंबूचा रस त्वचेसाठी ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. त्यामुळे आपले पाय उजळ आणि चमकदार बनतात. मध हे अत्यंत गुणकारी आहे. यामुळे पाय मॉइश्चरायझर राहते. त्याचबरोबर मधा मध्ये असलेले फेनोलिक आणि फ्लेओनोइड हे घटक त्वचेला शुभ्र बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्ही एक मोठा चमचा मध,दोन मोठे चमचे लिंबूचे रस एकत्र करा आणि तयार झालेली पेस्ट तुमच्या पायाला लावा. पंधरा मिनिटानंतर पाण्याने पाय धुऊन घ्या.

कच्चे दूध

कच्चे दूध हे आपल्या पायाचे काळेपणा दूर करतो. हे अत्यंत जुनी आणि प्रभावी नैसर्गिक उपचार पद्धत आहे. कच्च्या दुधामध्ये लॅक्‍टिक ऍसिड नावाचा घटक असतो जो ब्लिचींग च्या स्वरुपात काम करतो आणि मृत असलेली पेशी बाहेर काढण्यासाठी मदत करतो. कच्च्या दुधाचा सतत उपयोग केल्यामुळे त्वचेला हळूहळू हलके होण्यासाठी मदत मिळते. एवढेच नव्हे तर हे मॉइश्चरायझर च्या रूपामध्ये ही काम करते आणि त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते. जर तुम्ही प्रत्येक दिवशी आपल्या पायाला कच्चे दूध लावला तर त्याचा चांगला फायदा होतो. हे दूध कमीत कमी वीस मिनिटे पर्यंत ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुऊन घ्या. या उपचार पद्धतीने आपल्या हाताचा रंगही आपण बदलू शकतो.

लिंबू आणि साखर

साखर हे त्वचेसाठी एक अत्यंत चांगले नैसर्गिक घटक आहे. जे एक्सफुलीइट्स करते आणि पायातील मृत पेशींना बाहेर काढते. पायाला रिजवीनेट करण्याचे कामही करते. तुम्ही याचा वापर स्किन ब्लिचिंग एजंट म्हणून लिंबू बरोबर करू शकता. यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये एक मोठा चमचा साखर घ्या आणि त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घाला. तयार झालेले मिश्रण पायाला लावा आणि काही मिनिटानंतर पाय मॉलिश करा त्यानंतर दहा मिनिटांनी आपले पाय धुऊन घ्या.

काकडी

काकडी ही एक अत्यंत नैसर्गिक फेशियल पॅक म्हणून काम करते. याच्या इफेक्टमुळे काळे डाग दूर होण्यासाठी मदत होते. आणि त्वचेला उजळपणा येतो. काकडीने पायावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत त्या ठिकाणी पाच मिनिटापर्यंत घासा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी पाय धुवून घ्या. तुम्हाला चांगल्या रिझल्ट साठी यामध्ये लिंबू चा सुद्धा वापर करू शकता.

पपई दही आणि हळद

पपईमध्ये पैपैन नावाचे एंझाईम असते जे त्वचेवरील मृत पेशी ना बाजूला करते आणि त्वचेला उजळपणा देते. दही एक्सफुलेइटिंग गुणामुळे अधिक परिणामकारक ठरते त्याच बरोबर एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून त्वचेला मुलायम आणि चमकदार बनते. एका बाऊलमध्ये अर्धा कप किसलेला पपई घ्या त्यामध्ये पाव कप दही आणि एक मोठा चमचा गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद घाला.यामुळे एक पेस्ट तयार होईल हे पेस्ट पायाला लावा. पंधरा मिनिटानंतर पाय धुऊन घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com