esakal | TCS, Wipro, HDFC सह दिग्गज कंपन्यांचे 'वर्क फ्रॉम होम' बंद
sakal

बोलून बातमी शोधा

TCS, Wipro, HDFC सह दिग्गज कंपन्यांचे 'वर्क फ्रॉम होम' बंद

कोरोना रुग्ण घटले, लसीकरणाला वेग; दिग्गज कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम केलं बंद

TCS, Wipro, HDFC सह दिग्गज कंपन्यांचे 'वर्क फ्रॉम होम' बंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसंच लसीकरण मोहिमही वेगाने सुरु आहे. त्यामुळे आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कार्पोरेट कंपन्या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये कामासाठी बोलावण्याच्या तयारीत आहेत. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम देण्यात आले होते ते आता बंद केले जाण्याची शक्यता आहे. नेस्ले इंडिया, टाटा कन्झ्युमर, अॅमवे, डाबर, गोदरेज यांसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिस आणि हायब्रिड मॉडेल निवडण्याचा पर्याय दिला आहे.

काही दिवसांपूर्वी टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी घोषणा केली होती की, कंपनी त्यांच्या ९० टक्के कर्मचाऱ्यांना २०२२ च्या सुरुवातीपर्यंत ऑफिसमध्ये परत बोलावण्याची तयारी करत आहे. मात्र टीसीएसने अशी घोषणाही केली होती की, कंपनीन २०२५ पर्यंत २५ टक्के कर्मचाऱ्यांना याच्या २५ x 25 मॉडेल अंतर्गत घरातून काम करण्यासाठी परवानगी देईल. विप्रो, इन्फोसिस यांसारख्या इतर आयटी कंपन्यांकडूनसुद्धा हाच मार्ग अवलंबला जात आहे.

लिंक्डइनच्या सर्वेनुसार, बहुतांश भारतीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वर्क लाइफचे संतुलन राखण्यासाठी हायब्रिड वर्क गरजेचं आहे. कारण यामुळे त्यांना खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात योग्य पद्धतीने संतुलन राखता येतं. लिंक्डइनने फ्यूचर ऑफ वर्क स्टडी २०२१ नुसार १० पैकी ९ जणांचे म्हणणे आहे की, हायब्रिड वर्क हे त्यांच्या वर्क लाइफ बॅलन्सवर सकारात्मक परिणाम होतो.

हेही वाचा: ‘फोर्ड इंडिया’च्या माघारीने कर्मचारी वाऱ्यावर!

डेलॉइटच्या एका सर्वेनुसार, ८४ टक्के भारतीयांसह सर्वांनाच असं वाटतं की, ऑफिसला जाणं सुरक्षित आहे आणि भविष्यासाठी सकारात्मक अशी भूमिका घेत आहेत. डेलॉइटच्या ग्लोबल स्टेट ऑफ कन्झ्युमर ट्रॅकरच्या नव्या मासिक विश्लेषणातून देशात खर्चात सुधारणा झाल्याचे संकेत मिळतात. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येमुळे आणि लसीकरण मोहिमेच्या वेगामुळे हे चित्र दिसत आहे.

टीसीएस, विप्रो, इन्फओसिस यांसारख्या आय़टी कंपन्यांसह बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील काही महत्त्वाच्या कंपन्यांनीसुद्धा त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यात वर्क फ्रॉम होम बंद करण्यासाठी सुरु असलेल्या तयारीबाबत सांगण्यात आलं आहे. देशातील कोटक महिंद्रा बँक वर्षाअखेरपर्यंत त्यांच्या ९० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची योजना तयार करत आहे. याशिवाय एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, येस बँक आणि डेलॉइटसुद्धा पुढच्या काही महिन्यात ९० टक्के कर्मचाऱ्यांसह ऑफिस सुरु करण्याची तयारी करत आहेत. कोटक महिंद्राने असंही स्पष्ट केलं आहे की, बँक दोन्ही लस घेतलेल्या ९० टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा प्लॅन आहे.

हेही वाचा: गुरुवारी शेअर बाजारात घसरण, जाणून घ्या आज कशी असेल स्थिती?

एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड यांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने म्हटलं की, राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार १०० टक्के कर्मचाऱ्यांसह आमच्या सर्व कार्यालयात काम सुरु आहे. आम्ही गर्भवती महिला, १ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं असलेल्या महिला, ६५ वर्षांवरील कर्मचारी, आजारी असलेल्या आणि कंटेनमेंट झोनमधील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास मुभा दिली आहे.

विप्रोने म्हटलं की, दोन लस घेतलेले सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी भारतातील कार्यालयातून काम करण्यास सुरुवात करावी. त्यासाठी हायब्रिड पद्धतीने काम करता येणार आहे. यात उच्च पदावरील अधिकारी आठवड्यातून दोन दिवस सोमवारी आणि गुरुवारी काम करत आहेत.

loading image
go to top