तुमची मुलं Bad Words वापरू लागली आहेत? मग या ५ गोष्टी त्यांना नक्की समजवा

लहान मुलांच्या मेंदूची ग्रहण करण्याची शक्ती चांगली असते. अशात जर त्यांचा चुकीच्या व्यक्तींशी संपर्क आला तर अनेकदा त्यांच्या वागण्यात वाईट बदल घडता
मुलांना समजवा
मुलांना समजवाEsakal

प्रत्येक आई-वडिलांना आपलं मुल संस्कारी असावं असंच वाटत. आपल्या मुलाच्या स्वभावाचं आणि त्याच्या वागण्याचं चारचौघांनी कौतुक करावं तसचं त्याचा दाखला इतरांना द्यावा अशी आई वडिलांची इच्छा असते. Teach How to Behave to your children stop them using bad words

खरं तर लहान मुलांचं Children मन हे अत्यंत नाजूक असतं तर मेंदू मात्र खुपच तिक्ष्ण असतो. आजुबाजूच्या व्यक्तींचा आणि वातावरणाचा त्यांच्या मनावर आणि मेंदूवर Brain लगेचच परिणाम होत असतो. अनेकदा मुलांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढू लागला की त्यांच्या वागण्यात बदल घडतो.

लहान मुलांच्या मेंदूची ग्रहण करण्याची शक्ती चांगली असते. अशात जर त्यांचा चुकीच्या व्यक्तींशी संपर्क आला तर अनेकदा त्यांच्या वागण्यात वाईट बदल घडतात. अर्थ कळत नसतानाही मुलं Children शिव्या किंवा वाईट भाषा Bad Language वापरू लागतात. मुलांच्या या बदलांकडे Changes आई-वडिलांनी दूर्लक्ष करू नये. कारण वेळीच दखल घेतल्यास मुलांमध्ये चांगले बदल घडवणंही सहज शक्य आहे. 

काही साध्या पद्धतीने मुलांचा समजावणं सोपं आहे. ज्यामुळे त्यांना योग्य संगत कोणती हे देखील समजू शकेल आणि ते वाईट भाषा वापरणं बंद करतील. 

मुलांना शिव्या देण्यापासून कसं रोखावं 

वेळीच त्यांना थांबवा- जर तुम्ही तुमच्या मुलाला अपशब्द किंवा वाईट भाषा वापरताना ऐकलंत. तर त्यांना लगेचच थांबवा. असे शब्द वापरू नयेत, हे त्यांना प्रेमाने समजवा. तो एक चांगला मुलगा आहे, अशी भाषा वापरल्याने त्याला इतर वाईट समजतील आणि दूर करु शकतील हे त्याला समजवा. चांगल्या मुलांना कायम प्रेम मिळतं असं सांगून त्याला अपशब्द वापरु नये हे पटवून द्या. 

संगतीवर नजर ठेवा- तुमच्या मुलाची कुणासोबत संगत आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. तुमच्या मुलाने अपशब्द वापरू नये त्यानं चांगलं वागावं असं तुम्हाला वाटतं असेल तर त्याची संगत कुणाशी आहे याकडे लक्ष ठेवा. मुलांचे मित्र कसे आहेत. त्यांच्या घरातील वातावरण कसं आहे हे पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा मित्रांचा प्रभाव मुलांवर पडत असतो. 

हे देखिल वाचा-

मुलांना समजवा
Child Brain : मुलांना बनवायचे असेल हुशार तर असा असावा आहार

चांगलं आणि वाईट यातील फरक समजवा- लहान मुलं निरागस असतात अनेकदा त्यांना काय चांगलं आणि काय वाईट यातील फरक लक्षात येत नाही. त्यामुळे चांगली भाषा आणि वागणुक कोणती आणि वाईट भाषा कोणती तसच ती वापरल्याने होणारे परिणाम हे तुम्ही त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. एकदा त्यांना हा फरक लक्षात आला की वाईट लोकं किंवा संगतीपासून ते स्वत: दूर राहतील. 

त्यांचे आदर्श बना- मुलांना सर्वात जास्त सहवास लाभतो तो म्हणजे कुटुंबियांचा. त्यातही आई-वडिलांसोबत ते सर्वात जास्त वेळ घालवत असतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण स्वत: मुलांसमोर अपशब्द किंवा वाईट भाषेचा वापर आणि वाद टाळणं गरजेचं आहे.  

मुलांसाठी आई-वडिल हेच त्यांचे आदर्श असतात. यासाठीच सर्वप्रथम आपली वागणूक चांगली हवी. आई-वडिलाचा व्यवहार प्रेमळ असेल तर मुलंही प्रमेळ आणि समजूतदार होतील. 

अपशब्दांचा अर्थ विचारा- मुलाने जर एखादा अपशब्ध किंवा शिवी दिल्यास त्याला त्याचा अर्थ विचारा. यामुळे त्याला त्याची चूक लक्षात येईल.  तो खराब भाषा शिकला आहे आणि ती चुकीची आहे हे त्याला लक्षात येईल. 

मुलांचं मत ऐकून घ्या- मुलांना विश्वासात घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं त्याचा विश्वास संपादन करणं आहे. तुमचं मुलांशी घट्ट नातं असलं तर ते नक्कीच अज्ञाधारक होतील. यासाठी मुलांशी संवाद वाढवा. यासाठी त्यांचं ऐकून घ्या. त्यांच्या शाळेतील गोष्टी. मित्रांसोबतचे किस्से , दिवसभरात काय केलं हे त्यांना विचारा आणि ते नीट ऐकून घ्या. 

यामुळे तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट शेअर करतील. तुम्हाला ते कुणासोबत वावरतात हे लक्षात येईल. 

मुलांनामध्ये चांगले बदल घडवून आणणं हे सहज शक्य असतं. मात्र त्यासाठी पालकांनी दक्ष राहणं गरेजं आहे. कठोर होण्याएवजी त्यांचे मित्र बना आणि त्यांना प्रेमाने समजवा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com