
शिक्षक दिन 2025 निमित्ताने गणपती बाप्पांच्या सात गुणांची शिकवण मुलांना देण्याची संधी आहे.
आई-वडिलांचा आदर, स्वत:मधील कमीपणा स्वीकारणे, समानतेची भावना, संयम, जिद्द न सोडणे, बुद्धिमत्ता आणि दयाळूपणा हे गुण मुलांना शिकवून त्यांना हुशार आणि दयाळू बनवता येईल.
Teachers Day 2025 : सध्या सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्सव पाहायला मिळत आहे. बाप्पाची मूर्ती, गाणी, भजने इ. सर्वत्र ऐकायला मिळतात. गणपती बाप्पाकडून जीवनातील अनेक पैलूंशी संबंधित जीवनाचे धडेही शिकता येतात जे मुले अंगीकारू शकतात. गणपती बाप्पाला आपण विद्याधीपती म्हणूनही ओळखतो. गणेशाची अनेक रूपे आहेत. बाप्पाला विद्येची देवताही म्हटले जाते. गणपती बाप्पा विद्याधीपती आहेत. ते देवांमध्ये श्रेष्ठ आहेत. गणपती बाप्पांकडून आपण शिकाव्या अशा अनेक गोष्टी आहेत. यंदा 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे पण त्याआधी शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पा कडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत याची माहिती घेऊयात.
गणपती बाप्पाकडून मुलांना पहिला धडा शिकायला मिळतो तो म्हणजे आई-वडिलांचा आदर करणे. गणेशजींनी आपल्या आई-वडिलांना आपले विश्व मानले. अशीही पौराणिक कथा आहे की, जेव्हा बाप्पाला संपूर्ण जग फिरण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी आई-वडील शिव आणि पार्वतीच्या भोवती फिरून यात्रा पूर्ण केली आणि त्यांना सांगितले की तुम्ही दोघेच माझे विश्व आहात.
गणपती बाप्पा इतर देवतांपेक्षा खूप वेगळे होते. त्याचे डोकेही सामान्य देवी-देवतांसारखे नव्हते. पण, या त्यांच्यातील फरकाला त्यांनी कधीच कमतरता मानली नाही. मुले इतरांपेक्षा वेगळी असतील तर त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. परंतु त्यांच्यातील कमतरतांमुळे मुलांनी कधीच कमीपणा जाणवून देऊ नये, ही शिकवण
असे म्हणतात की गणेशजींनी कधीही कोणाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, दुर्बल किंवा गरीब मानले नाही. पालकांनी आपल्या मुलांमध्ये तेच गुण बिंबवले पाहिजेत जेणेकरून त्यांनी कधीही कोणाचाही अनादर करण्याचा प्रयत्न त्यांना कमकुवत समजून त्याऐवजी सद्भावना आणि दयाळूपणा दाखवावा.
अति घाई संकटात नेई, असे म्हटलं जातं. कोणतंही काम संयमाने केलं की पुर्णत्वास जातं. गणपती बाप्पांनी नेहमीच प्रत्येक गोष्ट संयमाने शांतपणे केली. त्यामुळेच कैलास पर्वतावरील बंधू कार्तिकेयांशी लावलेली पैज ते जिंकू शकले. मुलांना तुम्ही संयमाने केलेल्या गोष्टींचे महत्त्व पटवून दिलं तर ते तुमच्यासाठी मुलांमधील ही स्थिरता त्यांना कठीण काळात विचार करण्याची आणि समजून घेण्याची बुद्धी देते.
गणपती बाप्पाकडून मुलांना पहिला धडा शिकायला मिळतो तो म्हणजे आई-वडिलांचा आदर करणे. गणेशजींनी आपल्या आई-वडिलांना आपले विश्व मानले. अशीही पौराणिक कथा आहे की, जेव्हा बाप्पाला संपूर्ण जग फिरण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी आई-वडील शिव आणि पार्वतीच्या भोवती फिरून यात्रा पूर्ण केली आणि त्यांना सांगितले की तुम्ही दोघेच माझे विश्व आहात.
गणपती बाप्पा इतर देवतांपेक्षा खूप वेगळे होते. त्याचे डोकेही सामान्य देवी-देवतांसारखे नव्हते. पण, या त्यांच्यातील फरकाला त्यांनी कधीच कमतरता मानली नाही. मुले इतरांपेक्षा वेगळी असतील तर त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. परंतु त्यांच्यातील कमतरतांमुळे मुलांनी कधीच कमीपणा जाणवून देऊ नये, ही शिकवण
गणपती बाप्पांनी कधीच हार पत्कारली नाही. यासंबंधी एक पौराणिक कथा आहे. कथेनुसार, लिहिताना गणेशजींच्या पेनाची टीप फुटली, तेव्हा त्यांचा एक दात तुटला आणि त्यानं लिहायला सुरुवात केली. ही फक्त एक कथा आहे पण त्यातून मिळालेला धडा हा जीवनाचा खूप महत्त्वाचा गुण आहे. मुलांनीही हार न मानता
प्रश्न: शिक्षक दिन 2025 ला गणपती बाप्पांच्या कोणत्या गोष्टी मुलांना शिकवाव्यात?
उत्तर: मुलांना गणपती बाप्पांचे बुद्धिमत्ता, दयाळूपणा, कठोर परिश्रम, नम्रता आणि सकारात्मकता हे पाच गुण शिकवावेत, जेणेकरून ते हुशार आणि दयाळू बनतील.
प्रश्न: गणपती बाप्पांच्या कथांमधून मुलांना बुद्धी कशी शिकवावी?
उत्तर: गणपतीने कार्तिकेयाला बुद्धीने पराजित केल्याची कथा सांगून मुलांना समस्यांचे निराकरण बुद्धीने कसे करावे हे शिकवता येते.
प्रश्न: शिक्षक आणि पालक मुलांना दयाळूपणा कसा शिकवू शकतात?
उत्तर: गणपतीच्या दयाळू स्वभावाच्या कथा सांगून आणि स्वतः दयाळूपणाचे उदाहरण देऊन मुलांना सहानुभूती आणि मदत करण्याचे महत्त्व शिकवावे.
प्रश्न: शिक्षक दिनानिमित्त गणपतीच्या मूल्यांवर आधारित कोणते उपक्रम आयोजित करता येतील?
उत्तर: शाळेत गणपतीच्या कथांवर आधारित नाटक, निबंध स्पर्धा, कला उपक्रम किंवा चर्चासत्र आयोजित करून मुलांना ही मूल्ये शिकवता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.