

Teachers' Day Special: Life and Legacy of Dr. Sarvepalli Radhakrishnan
esakal
Teachers' Day Special: दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात 'शिक्षक दिन' म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती, थोर तत्त्ववेत्ते, विद्वान शिक्षणतज्ज्ञ आणि मुत्सद्देगिरीचे प्रतीक असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष दिवस साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील एका छोट्या गावात जन्मलेल्या डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि तत्त्वज्ञानाच्या बळावर जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली.