
Teddy Day 2023 : रूझवेल्टने अस्वलाला गोळी घातली तरी त्यांचे नाव टेडी बिअरला का देण्यात आले?
व्हॅलेंटाईन विकमधील आज चौथा दिवस असून जगभर टेडी डे म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी टेडी बिअर एकमेकांना भेट म्हणून दिले जातात. त्यानिमित्तानेच टेडी या बाहुल्या अस्वलाचा इतिहास जाणून घेऊयात.
मुलींसाठी टेडी म्हणजे त्यांचा मित्र, सखाच होय. मनातल्या अनेक गप्पा गोष्टी त्या टेडीसोबत करत असतात. त्यामूळे मुलींकडे असलेले टेडीची स्पर्धाच पहायला मिळते.
टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून झाली. जेव्हा मिसीसिपी आणि लुझियाना यांच्यात सीमा वाद सुरू होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थेयोडोर रुझवेल्ट होते. रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होते. रुझवेल्ट एक राजकारणी होतेच त्याचबरोबर ते एक चांगले लेखक देखील होते. मिसिसिपी आणि लुझियानातील वाद मिटविण्यासाठी रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी त्या काळात मिसिसिपी जंगलाला भेट दिली.
यावेळी त्यांनी झाडाला बांधलेल्या जखमी अस्वलाला पाहिले. या अस्वलाला कोणीतरी बांधले होते. त्याला खूप जखमा झाल्या होत्या. ते अस्वल तळमळत होते. रुझवेल्टने अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला. पण, त्या अस्वलाला पाहुन त्यांनी शिकार न करण्याचा निश्चय केला.

अस्वलाचे तळमळणे इतके होते की त्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी त्याला गोळी घालून ठार करण्यात यावे, असे आदेश रूझवेल्ट यांनी दिले. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा झाली होती. अमेरिकेतील त्यावेळच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रात कार्टुनिस्ट बेरीमेन यांनी ही घटना रेखाटणारं कार्टुन काढलं होतं, त्यातील कार्टुन अस्वल लोकांना खूपच आवडलं. ते पहिल्या टेडीच डिझाईनच होतं.
अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले. त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे त्याचे नाव टेडी बिअर ठेवले. त्याचे नाव रुझवेल्ट असे ठेवले गेले. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होते.