

Why Teddy Day Is Celebrated | History and Significance Exaplained
sakal
Why Is Teddy Day Celebrated: सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. आणि आज या वीकचा चौथा दिवस आहे, जो टेडी डे म्हणून साजरा केला जातो. दरवर्षा १० फेब्रुवारीला हा डे साजरा केला जातो. हा दिवस प्रेम आणि भावना व्यक्त करण्याचा प्रतीक म्हणून टेडी बेअर देण्याच्या पद्धतीसाठी ओळखला जातो. टेडी डे आपल्याला शब्दांपेक्षा जास्त भावना व्यक्त करण्याची संधी देतो आणि साध्या पण मनापासून केलेल्या कृतींनी नातं घट्ट करण्यास मदत करतो.
व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रेम, काळजी, मैत्री आणि आपुलकी साजरी करण्यासाठी वेगवेगळे खास दिवस येतात. त्यापैकी टेडी डे हा गोड आणि मनाला उब देणारा दिवस आहे. टेडी बेअर हा फक्त खेळणं नसून प्रेम, सोबत आणि आधाराची भावना देणारं प्रतीक आहे, जे कोणाचाही मूड लगेच छान करू शकतं.