

With a Mother’s Support, Soham Overcomes Autism and Builds His Own Identity
sakal
ठाण्यातील युवक सोहम अमिय रॉय दस्तीदार याने ऑटिझमसारख्या आव्हानांवर विजय मिळवत आपल्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे. लहानपणी त्याच्यासाठी साध्या वाटणाऱ्या गोष्टी – शाळेतील प्रकल्पांमध्ये भाग घेणे, वाढदिवसाच्या कार्यक्रमांना जाणे, मित्र बनवणे – या सर्वच कठीण होत्या. सामाजिक व्यवहार आणि संवाद हे त्याच्यासाठी दररोजचे आव्हान होते. तरीही, सोहमने हार मानली नाही. त्याची आई मिशुआ हिने त्याला नेहमीच आधार दिला आणि त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवला.