- पूजा काळे आणि प्रज्ञा पाटील
'कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा काळे हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. सातत्य, समर्पण आणि संयम या तिन्ही गुणांच्या जोरावर पूजाला मालिकेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख मिळाली आहे. अभिनयाबरोबरच तिच्या आयुष्यातली अजून एक खास गोष्ट म्हणजे तिची मैत्रीण- प्रज्ञा पाटील.