- अमृता पवार, अभिनेत्री
माझी आई एक उत्कृष्ट गृहिणी आहे. लहानपणापासून मी तिला अनेक जबाबदाऱ्या एकाचवेळी अतिशय चोखरीत्या पार पाडताना पाहत आले आहे. स्वयंपाक, घरकाम, पाहुणचार, आमचं संगोपन हे सर्व करत असताना तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवलं नाही. तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे आमचं घर सदैव आनंदी आणि खेळकर वातावरणात भरलेलं असायचं.