काही रेल्वे स्टेशनची नावे इतकी विचित्र आहेत की ते उच्चारताना आपोआप माणसांची तोतरी उडते...

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कसाठी ओळखली जाते. या रेल्वे नेटवर्कमध्ये आपल्याला अशी अनेक स्टेशन्स पाहायला मिळतील जी कोणत्या तरी गोष्टी करता खास आहेत.
railway station
railway stationgoogle

मुंबई : आपल्या देशात छोटी-मोठी नावं असलेली असंख्य रेल्वे स्टेशन्स आहेत.पण त्यासोबत काही रेल्वे स्टेशनची नावे इतकी विचित्र आहेत की ते उच्चारताना आपोआप माणसांची तोतरी उडते.

आज आपण आपल्या देशातील अशाच रेल्वे स्टेशनच्या नावाविषयीच्या गमंती पाहणार आहोत. यापैकी एका रेल्वे स्टेशन नाव फक्त 2 शब्दांचे आहे. तर दुसऱ्या एका रेल्वे स्टेशनचं नाव इतकं मोठं आहे की ते वाचतानाच तुमचं डोकं चक्रावून जाईल.

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कसाठी ओळखली जाते. या रेल्वे नेटवर्कमध्ये आपल्याला अशी अनेक स्टेशन्स पाहायला मिळतील जी कोणत्या तरी गोष्टी करता खास आहेत. म्हणजे, काही त्यांच्या स्टेशनच्या नावाने प्रसिद्ध असतील, काही त्यांच्या लहान नावामुळे प्रसिद्ध असतील, तर काही प्राण्यांच्या नावाने प्रसिद्ध असतील.

पण आज आम्ही देशातील त्या रेल्वे स्टेशनविषयी बोलणार आहोत, ज्यापैकी एका रेल्वे स्टेशनचे नाव फक्त 2 शब्दांचे आहे, तर एक नाव असे आहे की वाचताना तुमचे डोके चक्रावून जाईल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र आणि अनोख्या नावाच्या रेल्वे स्टेशनबद्दल माहिती सांगणार आहोत.

1) सर्वांत लहान नाव असलेले स्टेशन - ओडिशाचे IB स्टेशन

'IB' रेल्वे स्टेशन ओडिशातील झारसुगुडा गावाजवळ आहे, जे फक्त दोन अक्षरी नाव असलेले स्टेशन आहे.

'IB' हे हावडा-नागपूर-मुंबई मार्गावरील टाटानगर-बिलासपूर विभागावरील दुसरा क्रमांक असलेला प्लॅटफॉर्म आहे. आयबी (IB)ची स्टेशन बिल्डिंग आणि परिसर खूपच लहान आहे. तिथे एक छोटंसं तिकीट काउंटर आणि वेटिंग रूम देखील आहे. या स्थानकावरून फारच कमी गाड्या ये जा करतात आणि गाड्या देखील येथे फक्त 2 मिनिटे थांबतात. यामुळेच दोन ते चार प्रवासी आयबी स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असतात.

2) सर्वांत लांब नाव असलेले रेल्वे स्टेशन-

वेंकटनरसिंहराजूवरीपेटा हे भारतातील सर्वांत लांब रेल्वे स्टेशन नावासाठी ओळखले जाते. ज्यामध्ये 28 प्लॅटफॉर्म आहेत. याला वेंकटनरसिंह राजुवरीपेट असेही म्हणतात. हे स्टेशन तामिळनाडू राज्याच्या सीमेवर आंध्र प्रदेश (चित्तूर जिल्ह्यात) आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व भारतीय रेल्वे स्थानकांपैकी वेंकटनरसिंहराजूवरीपेटा हे सर्वांत लांब नावाचे 'रेल्वे स्टेशन' आहे. पुत्तुरु, मंगलम आणि तिरुपती ही त्याची सर्वांत जवळची स्थानके आहेत. वेंकटनरसिंहराजूवरीपेटा स्थानकापासून जवळपास 85 रेल्वे स्थानके थेट जोडलेली आहेत.

3) सर्वांत मोठे प्लॅटफॉर्म असलेले स्टेशन -गोरखपूर

आता गोरखपूरमध्ये असलेल्या सर्वांत मोठ्या रेल्वे प्लॅटफॉर्मबद्दल जाणून घ्या. सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म गोरखपूर रेल्वे स्टेशनवर आहे . ज्याची लांबी 1366 मीटर आहे. पूर्वी या रेल्वे स्टेशनच नाव खरगपूर असे होते.

4) सर्वांत लहान रेल्वे स्टेशन

सर्वांत लहान रेल्वे स्टेशन पेनुमुरु रेल्वे स्टेशन आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात असलेले पेनुमारू रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वांत लहान रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वेस्थानकाविषयी एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नसल्याचे सांगण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com