

Paithani Saree History
Sakal
Paithani saree : ‘गोष्ट साड्यांची’ या सदरात प्रसिद्ध होणाऱ्या, साड्यांच्या लेखमालेतील हा शेवटचा लेख. या सदरात भारतात हातमागावर विणल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विणींच्या काही साड्यांवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला; पण अजूनही बऱ्याच साड्या बाकी आहेत. मात्र, हा शेवटचा लेख असल्यामुळे या सदराची सांगता महावस्त्र पैठणीनेच करणं उचित राहील.