- अश्विनी आपटे-खुर्जेकर
उद्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सोहळा. आपण प्रत्येक वर्षी १५ ऑगस्ट हा दिवस अभिमानाने साजरा करतो; पण जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं होतं, तसंच आपल्या मनाला, विचारांना, आणि जीवनशैलीलाही स्वातंत्र्य मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनातून मुक्त होणं नाही, तर स्वतःच्या विचारांना, निर्णयांना आणि भावनांना योग्य तो सन्मान देणं.